शिरूर - भटकंती धनगरांची

Image may contain: one or more people, outdoor and natureभटकंती धनगरांची
कधी थांबेल वणवण अशी
माझ्या धनगर समाजाची
मेंढराच्या कळपासोबतची
भटकंती गावोगावची......!!1!!

डोक्यावर बिर्हाड अन कमरेवर तान्ह...
धनगराची ती रणरागिणी चालते अनवान
काट्याकुट्याचं तुडवीत रान......!!2!!

गोजिरवाणी मेंढर माझ्या समाजबांधवांची
त्याच्या असतात सदैव संगतीला....
काळा वाघ्या असतो हो सदैव संगतीला
काळा वाघ्या असतो हो सदैव रानाच्या फिरतीला !!3!!

हातात काठी अन् पायात तोडा घोंगडी पाठीला
धनगर समाज माझा नेहमीच असतो ऊभा माळरानाला
कपाळी भंडारा लावून नेहमीच धनगर माझा
तत्पर असतो जय मल्हार बोलण्याला......

- सुरेखा बिराजी आसवले
शिरूर, जि-पुणे.
surekhaasavale95@gmail.com
Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य