शिरूर - चिञातुन भाव व्यक्त करणारा कलोपासक...(सतीश केदारी)

"खरंतर चिञकलेकडे मी कधीच 'विलास' म्हणुन बघितलंच नाही तर सदैव 'पुजा' म्हणुनच त्यात रमलो.निसर्गचिञ काढताना निसर्गाची पुजा,व्यक्ती साकारताना व्यक्तीची पुजा केली.चिञ काढताना मेंदुचा वापर न करता ह्रदयाचा वापर केला त्यामुळेच अनेक चिञप्रदर्शनात सांगली, सोलापुर,कोल्हापुर ची माणसं प्रतिमांसमोर अक्षरश: रडताना पाहिली".अशी जगावेगळी चिञकलेची उपासना केलीय शिरुर मधील प्रताप घायडक यांनी.
शिरुर येथील जोशीवाडी येथे राहणारे प्रताप घायतडक  हे तसे पेशाने शिक्षक.याबाबत बोलताना त्यांनी सांगितले कि,ग्रामीण व कोकणात दुर्गम  भागात अध्यापनाचे कार्य करत असताना तेथिल परिस्थिती पाहुन त्यानंतर चिञ रेखाटलं होतं ते मनाला इतकं भावलं कि त्यानंतर कायमचाच छंद लागला.परंतु या कलेची आवड लहानपणापासुनच होती.दुर्गम भागातील  बदली शिरुर तालुक्यात झाल्यानंतर त्यांनी याच कलेला आणखीन आकार देण्याचा प्रयत्न केला.त्यांनी तैलचिञं, व्यक्तीचिञ,निसर्गचिञ, अशा  एक ना अनेक प्रकारची विविध प्रकारची चिञं रेखाटली आहे.
शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील मंदिरात चिञांचं प्रदर्शन भरवण्यात आल अन त्याच ठिकाणी ख-या चिञकाराला कलाटणी मिळाली.त्या ठिकाणी श्रींचं काढलेलं बोलकं चिञ अनेकांना भावलं.तर प्रसिद्ध जैन साध्वी प्रिती सुधाजी यांना महावीरांची प्रतिमा होती.त्यांना तीन महिन्यांच्या प्रचंड अभ्यास व मेहनतीनंतर महावीरांचं रेखाटलेले तैलचिञ दिले.ते इतके हुबेहुब होते त्या चिञाचे नाशिकला माजी मंञी सुरेशदादा जैन यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.त्यांच्या या चिञांची भुरळ भल्या-भल्यांना पडली.ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांचे तैलचिञ हवे होते.ते इतके हुबेहुब काढण्यात आले होते.त्या चिञाकडे पाहुन अनेकांना अश्रु अनावर होत होते.साक्षात अण्णांनाही त्या चिञाकडे पाहुन गहिवरुन आलं होतं घायतडक सांगत होते.

याबाबत बोलताना त्यांनी सांगितले कि,खरंतर चिञकलेकडे मी कधीच 'विलास' म्हणुन बघितलंच नाही तर सदैव 'पुजा' म्हणुनच त्यात रमलो.निसर्गचिञ काढताना निसर्गाची पुजा,व्यक्ती साकारताना व्यक्तीची पुजा केली.चिञ काढताना मेंदुचा वापर न करता ह्रदयाचा वापर केला त्यामुळेच अनेक चिञप्रदर्शनात सांगली, सोलापुर,कोल्हापुर ची माणसं प्रतिमांसमोर अक्षरश: रडताना पाहिली.

समोरच्या व्यक्तीला कलेच्या माध्यमातुन आनंद मिळवुन देणं हेच जर कोणत्याही कलाकाराचं ध्येय असावं अगदी तेच माझंही आहे.चिञांकडे केवळ आनंद देण्याचं साधन म्हणुन न पाहता याच माध्यमातुन इतके हात बळकट करावेत कि त्यातुन समाजासाठी वेगळं काहीतरी करता येइलं.

घायडक यांनी आजतागायत विविध प्रकारची ६०-७० विविध प्रकारची चिञं रेखाटली असुन संपुर्ण घर या चिञांनी भरुन गेलं आहे.या माध्यमातुन कला जोपासलीय परंतु याचं व्यापारीकरण माञ कधीच केलं नाही.काही चिञ पाहताना आपल्याला भास होतो तर अनेकदा रडायला आल्याशिवाय राहत नाही.समाजाने या कलोपासकाचे हात बळकट करण्याची आज खरी गरज आहे.
प्रताप घायतडक
मो.नं : ८७९३०६१०४९

संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य