रांजणगाव गणपती - शिवाजी महाराजांचे स्मारक उभे रहावे...

No automatic alt text available.मी, निकिता संजय पाचुंदकर (पाटील). रांजणगाव गणपती येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे व्हावे असं मला वाटते आहे, म्हणून हे रांजणगाव गणपती येथील तमाम गावकऱ्यांच्या पुढाकाराने हे स्मारकाचे काम व्हावे. रांजणगावातील तमाम जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी मी हा लेख लिहित आहे.✍🏻

मराठ्यांनाच प्रश्न असेल...?

शिवरायांच्या स्मारकासाठी इतका अट्टाहास कशाला....?  पण  महाराष्ट्रात अनेक ठिकाणं अशी आहेत की गावात छत्रपती शिवरायांचं स्मारक आहे, आणि राज्याचं स्मारक प्रत्येक गावात असावं. पण प्रश्न शिवरायांचा येतो तेव्हा, मराठ्यांच्या भावनांची महाराष्ट्रातच काही कदर करत नाही, ज्या शिवरायांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हिंदवी स्वराज्य स्थापले... आणि संपूर्ण महाराष्ट्र मराठ्यांच्या नावे व्हावा म्हणून महाराष्ट्रावर रक्त शिंपडले, त्यांच्या स्मारकासाठी निधी नसतो.?  महाराष्ट्र शिवरायांचाच आणि शिवरायांच्याच स्मारकासाठी लढावं लागतय.... ह्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती महाराष्ट्रासाठी आणि मराठ्यांसाठी ?
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (शिवस्मारक) लवकरात लवकर उभारल गेलच पाहिजे ..तो काळ होता.. ते मराठे होते. शिवरायांचा शब्द ऐकल्यावर सर्व विसरून जाणारे मराठे होते.. मग घरात कोणतेही कार्य असो + सण + त्योहार असो. शिवरायांच्या शब्दाखातर जीवाची बाजी लावणारे मराठे होते... शिवरायांचा शब्द पाळण्यासाठी जीवाची पर्वा न करणारे मराठे होते... जीव जाणार माहीत असूनहि... सतत पुढे येणारे मराठे होते..

मग आता झालं तरी काय..?
त्या शिवरायांच्या पुतळ्यासाठी / स्मारकासाठी सर्व माघार का घेत आहेत...? Valentine day वर बंदी आली की संपूर्ण महाराष्ट्रातली युवा शक्ती एकत्र येते.. मग ज्यांच्या मुळे.. हिंदुत्व, मराठीबाणा जन्माला आला त्यांच्या साठी मात्र आपली भावना कोरीच का ? मोजून नेते आहेत तरी किती ?... आणि मराठी जनता किती आहे ?

हिच वेळ आहे मराठ्यांनो.. दाखवून द्यायची...
आपल्यातही सळसळतंय तेच मर्दमराठ्याच रक्त ... शिवरायांसाठी आपण काय करू शकतो ते ... मराठीबाण्यासाठी आपण काय करू शकतो ते.... आम्ही आहोत तयार... राजेंच्या स्मारकासाठी आपण आहात का ?  'जय जिजाऊ' म्हटले की माणसाला माणसाची ओळख होते. 'जय शिवराय' म्हटले की माणसाला माणुसकीची जाणिव होते. 'जय शंभुराजे' म्हटले की माणसाला माणसाची धमक कळते.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (शिवस्मारक) लवकरात लवकर उभारला गेलाच पाहिजे .
जय जिजाऊ...
जय शिवराय...
जय शंभुराजे.....  

- निकिता संजय पाचुंदकर पाटील

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही