शिरूर - दुष्काळाचं वावटळ घोंगावतय...

Image may contain: 1 person, smiling, closeupसंकट चार पाऊल दूर आहे... शिरूर तालुक्यावर दुष्काळाचं वावटळ घोंगावतय... दुष्काळाची दाहकता आता सर्वांनाच जाणवायला लागली आहे. विशेषतः केंदूर आणि पाबळ सारख्या गावची परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. सोबतच धामारीचा देखील काही भाग तीव्र दुष्काळाच्या छायेखाली येऊ घातला आहे. माझ्या भवांनो सावध व्हा, "आपल्याकडे वेळ अजून बराच आहे" असं म्हणून हातावर हात ठेवून बसू नका., येणाऱ्या संकटबाबत जनजागृती करा जनावरांच्या चाऱ्याची आणि पाण्याची सोय होईल अशी आत्ताच काही तरी तरतुदी करा...

सर्वात मोठं संकट हे माझ्या केंदूरच्या माय-बाप शेतकऱ्यावर आलेलं आहे. शेजारच्या गावच्या नातेवाईकांचा आश्रय घ्या. शक्य असल्यास ज्या गावात पिण्याच्या पाण्याची शक्यतो टंचाई भासणार नाही अशा नातेवाईकांच्या दावणीला आपलं जनावर नेऊन घाला. आणि ज्या गावात खरंच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आहे जसं की करंदी, मुखई, दोनही जातेगाव, चिंचोशीचा काही भाग, वाजेवडी, मांजरेवाडी अशा गावांनी केंदूर धामारी पाबळ सारख्या गावांच्या संकटात धावून जायला हवं.

किमान पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी मदत करायला हवी. ज्यांना शक्य आहे त्यांनी जनावरांच रक्षण करावं ज्यांना शक्य आहे त्यांनी स्व:ताच्या विहिरी टँकर भरून नेण्यास खुल्या कराव्यात. शक्य असल्यास रोज एक, दोन किंवा शक्य त्या पद्धतीने टँकर भरून नेण्यास सहकार्य करावे. केंदूर, पाबळ आणि धमारीच्या शेतकऱ्यांनो सावध व्हा... आपलं पशुधन कवडीमोल भावात विकू नका. पोटच्या पोरांना जसं सांभाळलं तसं त्यांच्यासाठी देखील पाहुणे-राऊळ्यांचा आश्रय घ्या.

तरुण कार्यकर्ते आणि मित्रांनो आपण जसं निवडणूका लागल्यावर दारो-दारी जाऊन आपल्या उमेदवारासाठी मत माघायला पायपीट करता ना तशीच येणाऱ्या संकटाची जनजागृती करण्यासाठी स्व:ताच्या वाडीवस्तीवर पायपीट करा. आता कोणताही उमेदवार किंवा लोकप्रतिनिधी दुष्काळात मदतीला धावून येणार नाही आता तुमच्या घराच्या दारात कोणीही पैसे घेऊन येणार नाही आता आपलं आपणच शहाणं व्हायला हवं. गावपुढार्यांनी आता पूढे यायला हवं मोठ्या शेतकऱ्यांनी अथवा कालव्याच्या जवळच्या शेतकऱ्यांनी टँकर भरून देण्याची दानत दाखवायला हवी किमान जनावरांच्या आणि माणसांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मदत करायला हवी. आता तुमचे नातेवाईक आणि तुमचे आदर्श नेते बागायती क्षेत्रातील असतील तर त्यांना झोपेतून जागं करा तुमचं संकट त्यांना पटवून सांगा मदतीचं आव्हान करा.

  • आधी तुम्ही एकजुटीने पुढे या गावाची बैठक घ्या तरुणांना पाण्याचं महत्व पटवून द्या.
  • मित्रांनो मित्रांच्या मदतीला धावून जा आणि मित्रांनो मित्राकडे मदतीचा हात मागा...
  • पक्षाचं, गावचं, संघटनेचं, भावकिचं राजकारण बाजूला सारून पुढे या सरकारची वाट पाहत बसू नका दुष्काळाशी दोन हात करा..
संकट जवळ आलंय जागे व्हा
जनजागृती करा...


- विशाल वर्पे,
9860080879
हौशा हो, मायना तुना, प्रप्रप्रप्र... कर्रर्रर्रर्रर्र....
Comment Box is loading comments...

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही