शिरूर - आदोलन... (सुरेखा आसवले)

Image may contain: 1 person, indoorठिकठिकाणी रस्त्यावर उतरून ठिय्या मांडूण याला आंदोलन म्हणतात साहब.....
अस आम्हा सर्वसामान्यासाठी न्याय मागणं सर्वसोप साधन वाटतय साहब......

जेव्हा नटूनथटून दिसतात रस्ते
कधी पिवळ्याने कधी भगव्याने कधी निळ्याने साहब......
तरंगा कूठेच दिसत नाही तेव्हा वेगवेगळ्या प्रश्नांवर विभागलेला असतो आपला भारत देश साहब. ...

तेव्हा आम्ही न्यायासाठी ऊच्चारलेल्या
शब्दाची जेलभरो होते साहब...
पण तूम्ही ऊच्चारून केलेल्या शब्दानी केलेल्या दिशाभुलीसाठी कोणते कायदे असतात ओ साहब...

राग क्रोध सहनशक्ती संपते
ना साहब तेव्हा आत्मदहन
देण्यासही तयार असतात साहब.....
तेव्हा तूमच्या जिवाला धक्का हो लागू नये म्हणून पोलिस यंत्रणा नेहमीच सज्ज असते साहब.....


तरूणांनी राजकारणात सक्रिय व्हायला शिकायला हव

खूप झाले हाल देशाचे
पर्याय आता नवा पाहिजे
म्हतारे झालेत राजकारणी पक्षी
म्हणून आता गरूडाचा थवा पाहिजे
स्वातंत्र्यानंतर गेल्या 70-72 वर्षात गढूळ झालेले राजकारण, भ्रष्टाचाराच्या आहारी गलेली भारताची शासन पद्धती, बेजबाबदार अधिकारीवर्ग यांना वेळीच चोप देण्यासाठी आणि भारत देश महासत्ता बनण्याचे धुळीत मिळालेले स्वप्न पुन्हा पूर्ण करण्यासाठी. ..फक्त वंशावळीचाच राजकारणात असणारा वावर संपुष्टात आणण्यासाठी तरूणांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे...
कारण म्हातारपण आलेल्या राजकारणाला आजचा तरूनच नवसंजीवनी प्राप्त करून देऊ शकतो हा आमचा अहंकार नाही विश्वास आहे. तरूणांनो राजारणात येण्यासाठी नाव पैसा लागतो नाहीतर बाप तरी मोठा नेता लागतो हे सगळे पोरकट विचार सोडून सत्याचा मार्ग धरून अन देशसेवेचे व्रत मनात घेऊन तरूणांनो राजकारणात ऊतरलात ना तर मग कुणाची हिम्मत होणार नाही तूम्हाला दूर करण्याची फक्त महत्वाची एकच गोष्ट लक्षात ठेवा...
दोन पाच हजारांसाठी विकले जाऊ नका जनतेने प्रेमाने दिलेला आशिर्वादच एकहात अब्जो रूपया पेक्षा मोठा असतो हे ज्या दिवशी प्रत्येक तरूण आपल्या मनात बिबवेल ना मग भारत महासत्ता बनायला वेळ लागणार नाही
आज तूम्ही आम्ही पाहतोच की एखाद्या नेत्यावर आरोप सिद्ध होऊनही काहीच होत नाही याला जबाबदार आपणच आहोत
म्हणून येथे दोन ओळीत कायद्याला गूमफाव वाटतय
कायदे ही गुलाम होतातच कसे याचे...
त्यानाच जामिनावर बाहेर पाहतो आम्ही तेव्हा...
यासाठीच तर तरूणांनो राजकारणात यायलाच हवं...

- सुरेखा बिराजी आसवले, शिरूर, जि. पुणे
surekhaasavale95@gmail.com

संबंधित लेख


पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही