सणसवाडी - शिवरायांच्या दुरदृष्टीतुन समृद्ध वने (विठ्ठल वळसेपाटील)

                जगाच्या पाठीवर अनेक राजे व राज्य निर्माण झाली अनेकांनी राजसत्ता  हस्तगत केली तर अनेकांनी गुलामांचा वापर करून मिळवली.हे करत असताना जनता कधीच केंद्रस्थानी नव्हती परंतु शिवरायांच्या रयतेच्या राज्यात जनतेचं सुख हे केंद्रस्थानी होते. कोणतीच गुलामगिरी नव्हती.एक आदर्शवर्त राज्य निर्माण झाले. देशभर शिवरायांची पूजा होत असते. शिवजयंती सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चैतन्य निर्माण करणारा हा सण होय.शिवराजांच्या जयजयकारा ने आसमंत दुमदुमून निघतो. प्रतिमांचे पूजन व नानाविधी कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा चैतन्यसमयी जयघोष निनादत असताना अनुकरण करणे राहून जाते.त्या निमित्त शिरूर तालुका.डॉट कॉम ने शिवरायांच्या चरणी वाहिलेले पुष्प...

३५० वर्षां पूर्वी अखंड  हिंदुस्थानवर मोगल  सत्ता थैमान घालत असताना सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेल्या एका राज्याने रयतेचं राज्य उभे केलं. रयतेच्या सुख, दुःखाचा विचार केला गेला.कोणत्याही प्रकारे जनतेवर राज्य निर्मितीसाठी बळाचा वापर झाला नाही हीच ओळख जगाला दाखवून  दिली. आरमार उभे करताना जनतेचा व पर्यावरणाचा किती संगम उभा केला आहे ते शिवचरित्रात दिसते. आदर्शवत राज्य म्हणून छत्रपती शिवरायांच्या राज्य व्यवस्थेचा जगभर आभ्यास केला जातो.देशात या राजाचा जन्मसोहळा सण म्हणून साजरा केला जातो. आज शिवचरीत्र अनेकजण ऐकिवणारे असले तरी अनुकरण करणारी पिढीला जन्मच घ्यावा लागणार आहे. शिवरायांची राजनीती, न्यायनिवाडा, तह, परराष्ट्र धोरण, आरमार, युद्धनीती विषयीची आज्ञापत्रे किती मोलाची आहेत हे आभ्यासल्यावर कळते. आज्ञापत्रे साक्षात चरित्राचे दर्शन घडविणारा आरसा आहे. योग्य त्या ठिकाणी नम्रता, कधी अधिकारवानी तर कधी सक्तपणा  दिसतो. रयतेची काळजी करणारी हि पत्रे एक अमूल्य ठेवा आहे. देशातील सध्या पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना छत्रपती शिवरायांच्या  आज्ञापत्राचा अभ्यास केला गेला पाहिजे. शिवजंती उत्सव  आत्मसात करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यातील एक पैलू आरमार विषयक आज्ञापत्रातून रयतेची काळजी करणारा दिसतो.  

आरमारास तक्ते, सोंट, डोलाच्या काठ्या आदिकरून थोर
लाकूड असावी लागते, आपले राज्यांत अरण्यांत सागवानादि
वृक्ष आहेत त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूरचे परवानगीने तोडून
न्यावें. याविरहित जे लागेल ते परमुलखींहून खरेदी करून आणवीत
जावें. स्वराज्यांतील आंबे, फणस आदि करून हेही लांकडें
आरमाराच्या प्रयोजनाचीं, परंतु त्यांस हात लावूं देऊं नये. काय
म्हणोन, की, हीं झाडे वर्षां दोन वर्षांनी होतात असें नाही.

रयतांनी हीं झाडें लावून लेंकरासारखी बहुत काळ जतन करून
वाढविलीं. ती झाडें तोडिल्यावर त्यांचे दु:खास पारावार
काय ? एकास दु:ख देऊन जे कार्य करीन म्हणेल तें कार्य करणारा
सहित स्वल्पकाळाचें बुडोन नाहींसेच होते किंबहुना धनियाचे
पदरीं प्रजा पीडण्याचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावें
हानिही होते. याकरितां हे गोष्टी सर्वथैव होऊं न द्यावी.

कदाचित् एखादें जें झाड बहुत जीर्ण होऊन कामांतून गेलें असलें
तरी त्याचे धन्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोषें
तोडून न्यावें, बलात्कार सर्वथैव न करावा.
उत्तम प्रकार आरमार उभे करताना कोणत्याही शेकऱ्याच्या मालाला धक्का लागत नाही हि खरी लोकशाही आहे.

           ब्रिटिश साम्राज्याअगोदर जंगले समृद्ध होती.वनात अनेक विधी प्रकारची वनऔषधी व इमारत साठी व सैन्यदलासाठी लागणारी वृक्ष होते. ब्रिटिश राजवटीत समृद्ध जंगले नष्ट झाली त्याठिकाणी शोभेची व विदेशी झाडे आली. शिकारीच्या हौसेने अनेक प्राणी नष्ट झाले . स्वातंत्र प्राप्तिनंतरही जंगले समृद्ध झाली नाहीत उलट डोंगर, दऱ्या नष्ट होऊन उधोग धंदे विकसित झाले त्यांनी आपल्या सोयी प्रमाणे जंगल तोड केली आणि जंगलांचे विदेशीकरण करून जंगलातील प्राणीही भुकेने नष्ट झाले. या जंगलांसाठी शिवरायांची नीती वापरली असती तर आज पावसाचा व भूजल पातळीचा प्रश्न उभा राहिला नसता, पण हे लक्षात कोण घेतो. आज जंगले उजाड झाली आहेत. छत्रपती शिवरायांनी व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या युरोपियनांचा धोका ओळखला होता.

होणारी आक्रमणे, भविष्यातील सुरक्षितता लक्षात घेत सागरी महत्व वाढीस लागण्यास उत्तम आरमार उभे केले पाहिजे त्यांच्या आज्ञापत्रात दूरदृष्टी ने आरमार उभे केले जंगलांचे रक्षण करण्याचा दंडक हि स्वराज्य रक्षक कान्होजी आंग्रेंनी आमलात  आणलेला दिसतो.  शिवकाळात जंगल तोड बंदी असल्याने रयत सुखी दिसते कारण भूजल व्यवस्था उत्तम प्रकारे दिसते  व शेती समृद्ध व शेतकरी सुखी होता. आज शेतकरी मात्र संकटग्रत झालाय महाराजांच्या आज्ञापत्रांत त्यांनी त्यावेळी सावकारी करणारे हे टोपीकर व त्यांचे मालक याच्या पासूनच स्वराज्याचा  धोखा ओळखला होता. म्हणून आरामाची चांगली उभारणी केली हे करत असताना रयत दुखी होता काम नये याची दक्षता घेतली म्हणून रयत त्यावेळी सुखी होती आणि सर्वोतपरी स्वराज्य रक्षणाची काळजी करणारी ही रयत होती .

आरमारास लागणारे लाकूड जंगलातून आणावे ते हुजूराच्या परवानगीने आणावे यात जंगलातील लाकूड व त्याच जबाबदारी सांभाळणारे हुजूर यांची परवानगी महत्वाची मानली. उपलब्ध न झाल्यास परराज्यातून खरेदी करावी असे आज्ञा दिसते. आरमाराच्या उपयोगास आंबा फणस हि झाडे असली तरी त्यास हात लावू नये. वर्ष दोन वर्ष न होता ती रयतेने आपल्या मुलं सारखी जपलेली असतात त्याच्या परवानगीने घेतल्यास त्यांच्या दुःखाला पारावर राहणार नाही, शिवाय असे केल्या असे राज्य अल्प काळात बुडेल व राज्यास रयत पीडितांचे दोष ही लागेल यात रयत केंद्रस्थानी धरली असून लोकशाहीतील लोककल्याणाला किती महत्व आहे हे या आज्ञापत्रात दिसते. पुढे त्यांनी जीर्ण झालेले उपयोगात नसलेले झाड मालकाच्या परवानगीने घेऊन त्याचे मोल देऊ करावे. कोणत्याही प्रकारे रयतेवर अन्याय होता कामा नये. असे उत्तम आरमार उभे राहीले.

शिवरायांची दूरदृष्टी तुन ३५० वर्षापूर्वी वने किती समृद्ध होती ते या आज्ञापत्रा मधून दर्शन  घडते.आज्ञापत्रा बरोबर छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्राचा अभ्यास जगभर केला जातो, कारण प्रत्येक व्यवस्थेत रयत केंद्रस्थानी दिसते. आज मात्र देशातील लोकशाही व्यवस्थेत एकमेकांचे वाभाडे काढण्यात धन्यता मानणारी मंडळी उपजत आहे. त्यांना इतिहासाचा विसर पडला असून राजसत्ता सुंदरीच्या मोहात पडले आहेत. याना जागे करण्यासाठी शिवचरित्राची गरज आहे. प्रत्येक विषयावर शिवरायांची नीती महत्वाची ठरते. विशेष पर्यावरण प्रेमी मंडळींना आरमाराच्या आज्ञापत्रातून शिकून प्रत्येकाने प्रति वर्षी एक-एक  देशी वृक्ष जरी लावला त्यास जोपासले.तर त्यावर बसणारे पक्षी व मिळणार गारवा  तुम्हाला आयुष्यभर धन्यवाद देतील. आणि खऱ्या अर्थाने छत्रपतींच्या आम्ही पाईक आहोत असे म्हणण्याला अर्थ प्राप्त होईल.

विठ्ठल वळसेपाटील,सणसवाडी
(ज्येष्ठ पञकार,समिक्षक तथा स्तंभलेखक)
मो.नं : ८४८४०६६०४२

संबंधित लेख

  • 1