सणसवाडी - धर्मवीर संभाजी महाराज : पराक्रमी योद्धा (विठ्ठल वळसेपाटील)

Image may contain: 1 person, hatवढु बुद्रुका वरी खडे पसरले श्री शंभूच्या पायी ।।
तीच आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही ।।


या काव्य पंक्तीतून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्या ची गाथा नजरेसमोर उभी राहते.हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी देह बलिदान केला. वढु पंचक्रोषीतील शंभू भक्तांना संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाचा सार्थ अभिमान आहे. बलिदानाची जगाच्या पाठीवर  बलिदानाचा महिमा पहिला गेला नाही. ४० दिवसांच्या यातनामय प्रवासातून बलिदान झाले ते ११ मार्च १६८९ रोजी घडले, तो दिवस म्हणजे फाल्गुन आमावस्या चा होता. तो दिवस शके प्रमाणे ५ एप्रिल २०१९ रोजी येत असून संभाजी महाराजांच्या श्री क्षेत्र वढु बु.ता.शिरूर, व तुळापूर ता. हवेली येथे समाधीस्थळी लाखो शंभू भक्त आपल्या राज्याला मानाचा मुजरा करण्यासाठी येतात. धर्मवीर संभाजी महाराजांचा ३३० वा बलिदान स्मरणदिन त्या निमित्त समरण करूया...


Image may contain: table, outdoor and foodफाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन आमावस्या अशा एक महिन्याच्या कालखंडात वढु बु. व तुळापुर येथे संभाजी महाराजांचा बलिदानमास पाळला जातो.यामध्ये अनवाणी चालणे तसेच दिवसातून एकदा अन्न ग्रहण करणे,मिष्टान्न भोजन न घेणे, व्यसन न करणे, तसेच मासप्रारंभी मुंडन केले जाते. शोक मास असल्याने उत्सवाचे कार्यक्रम होत नाहीत. शंभूभक्त धर्मकर्तव्य म्हणून हे पार पडत असतात यासाठी  बलिदान स्मरण केले जाते. शंभूराजांना ४० दिवस यातना सहन कराव्या लागल्या त्यांच्या बलिदानातून मनात कुठेतरी राष्ट्रभावना वाढीस लागल्या शिवाय राहत नाही.

या बलिदान समरणदिना निमित्त दर वर्षी शासकीय पूजा, शासकीय मानवंदना, हेकॉप्टरमधून  समाधी स्थळावर पुष्पवृष्टी केली जाते. पुरंदर ते वढू पालखी सोहळा होतो. विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते.यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवशंभू भक्त उपस्थित राहतात.या कार्यक्रमास १ जानेवारी २०१८ नंतर या भागात कोणताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस फाटा तैनात केला गेला आहे. तसेच कायमस्वरूपी पोलीस चौकी ठेवण्यात आली आहे. विशेष  करून या वर्षी ड्रोन द्वारे नजर ठेवण्यात येत आहे. त्यामुळे लाखोशंभू भक्त याठिकाणी येणार आहेत. संभाजी राजे  देव, देश, आणि धर्मासाठी बलिदान केले म्हणून ते धर्मवीर ठरले. राष्ट्रभक्तांसाठी वढु व तुळापूर हि दोन शक्तिपीठे आहेत. 

१६८९ मध्ये शंभूराजें आप्त स्वकीयांचा मोठा त्रास होता. कवी कलश शंभू राजेंच्या मर्जीतले असल्याने ते सहन न करणारी मंडळी होती, त्यामुळॆ  पन्हाळा भागात कवी कलशांवर हल्ला केला. याची खबर मिळताच शंभूराजे समाचार घेण्यास निघाले हे समजताच  फितुरांनी  तिथून संगमेश्वर गाठले. त्यावेळी संभाजीराजांनी महत्त्वाच्या सरदारांची कोकणातील संगमेश्वरची बैठक बोलावली.ती संपवून राजे रायगडाकडे रवाना होत असतानाच फितूर आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर गुप्त हल्ला केला. मराठयांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली.प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहित. शत्रूने मात्र  शंभू राजे व कवी कलशांना अखेर १ फेब्रुवारी १६८९ रोजी जिवंत पकडले.

बहादूर (धर्मवीर) गडावर औरंगजेबा समोर शंभूराजे व कवी कलश  यांना हजर केले  सर्व किल्ले स्वाधीन व धर्मांतर केल्यास जीवदान या दोन अटी मांडल्या, पण स्वाभिमानी, धर्मनिष्ठ व गवताची काडी सुद्धा औरंगजेबाज देणार नाही म्हणून स्वराज्य रक्षणासाठी या गोष्टी लाथाडल्या. पुढे शंभू व कवींची एका घाणेरड्या उंटावर उलटे बसवून, विदूषकाचे कपडे घालून धिंड काढण्यात आली.कुराणाप्रमाणे शिक्षा फर्मावण्यात आली. यावेळी दुतर्फा असलेल्या सैन्याने दगड व भाल्यांचा मारा केला. पुढे हा मुक्काम तुळापूर येथे हलवला. तुळापूर संगमावर तेजस्वी नेत्रकमल काढण्यात आले.  त्यानंतर कवी कलश व शंभू राज्यांची जिव्हा छाटली. या घटनेने औरंगजेबाच्या छावणीत आसुरी जल्लोष माजला होता.शेवटाला शरीराची कातडी सोलली गेली व वीतभर तुकडे केले गेले आणि परिसरात फेकले गेले.असा ४० दिवसांचा यातनामय प्रवास शंभू राजे व कवी कलशांनी सोसला. पुढे वढु येथे शरीराचे तुकडे गोळा केले गेले त्यावर अग्निसंस्कार केला त्या ठिकाणी शंभूराजे व कवी कलशांची समाधी बांधण्यात आली. पुढे याच बलिदानातून मराठा साम्राज्य विस्ताराची प्रेरणा ठरली.

शंभूराजे हे स्वराज्य रक्षक तर होते या शिवाय विविध पैलूंचा ते रथ होते. ते एक महान योद्धा होते. हिंदुत्वाचे महान रक्षक होते. १४० तब्बल लढाया जिंकणारा अपराजीत योद्धा, संस्कृत पंडित, १४ भाषेंवर प्रभुत्व गाजवणारा, १४ व्या वर्षी बुधभुषण, नखशिखा, सातसतक ग्रंथ लिहिणारा राजा जगातला एकमेव अद्वितिय होत. जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट, जगातील पहिला तरंगता तोफखाना, जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतू बांधणारा, आदिलशाही, कुतुबशाहीची बरोबर  सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रजांना बरोबर मोघलांचा कर्दनकाळ ठरला.दुष्काळग्रस्त गावांत जल नियोजन,  उत्तरप्रदेश, तामिळनाडू , कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा,परस्त्रीचा सन्मान राखणारा, इतर धर्मांचा सन्मान, धर्मांतरावर कायदेशीर बंदी, बाल मजुरी व वेठबिगारी विरुद्धकायदा,  देहू ते पंढरपूर आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा शेतीसाठी पीक कर्ज योजना, सैनिकांच्या उत्पन्नाला चरईची सवलत,  सुसज्ज आरमार निर्मिती,  आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र जपला  या सर्व गोष्टी पार पडत असताना आपल्या बलिदानातून धर्मनिष्ठा जागवणारा धर्मवीर ठरला.छावा खरा मृत्युंजय ठरला. या बलिदानाच्या प्रेरणेतून शाहीर योगेश यांनी शंभू राजांचे अप्रतिम वर्णन केले आहे.

'देश धरम पर मिटने वाला,शेर शिवा का छावा था।।

महापराक्रमी परम प्रतापी,एक ही शंभू राजा था।।

तेज:पुंज तेजस्वी आँखें,निकल गयीं पर झुका नहीं ।।

दृष्टि गयी पण राष्ट्रोन्नति का,दिव्य स्वप्न तो मिटा नहीं ।।

दोनो पैर कटे शंभू के,ध्येय मार्ग से हटा नहीं ।।

हाथ कटे तो क्या हुआ?, सत्कर्म कभी छुटा नहीं ।।

जिव्हा कटी,खून बहाया, धरम का सौदा किया नहीं।।

शिवाजी का बेटा था वह, गलत राह पर चला नहीं।।

वर्ष तीन सौ बीत गये अब, शंभू के बलिदान को।।

कौन जीता - कौन हारा, पूछ लो संसार को।।

कोटि कोटि कंठो में तेरा, आज जय-जयकार है।।

अमर शंभू तू अमर हो गया, तेरी जय-जयकार है।।

मातृभूमि के चरण कमलपर, जीवन पुष्प चढाया था।।

है दुजा दुनिया में कोई, जैसा शंभू राजा था?।। ''   

या मृत्युन्जय दिनी  शंभू  राज्यांना त्रिवार वदंन !विठ्ठल वळसेपाटील,सणसवाडी
(लेखक ज्येष्ठ पञकार,समिक्षक तथा स्तंभलेखक आहेत.)
मो.नं : ८४८४०६६०४२


संबंधित लेख

  • 1

वाघाळे येथील शेतकऱयाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
 प्रशासन
 सरकार
 अवैध सावकार
 अन्य