सणसवाडी - जालियन बाग हत्याकांडाची शंभरी (विठ्ठल वळसेपाटील)

            Image may contain: 1 person, hat१५० वर्ष जुलमी सत्ता करणाऱ्या ब्रिटिशांनी अखंड हिंदुस्थानचे जाताना दोन तुकडे केले. अनेक अमानुष छळ केले व नरसंहार केले गेले.या नरसंहारात जालियन बाग हत्याकांड हि अमानुष घटना होय. ब्रिटीशांनी सत्ता प्रस्तापित करण्यासाठी अनेक प्रकारच्या अमानुष घटना घडविल्या या घटना वाचताना आजही अंगावर शहारे उभे राहतात. प्रेत्यक भारतीयाच्या मनात धगधगत राहणारी घटना म्हणजे जालियन वाला बाग हत्याकांड.  अमानुषतेचा कळस गाठलेली घटना आज शंभरी पार करत आहे. १३ एप्रिल १९१९ रोजी पंजाब प्रांतातील अमृतसर येथील जालियन बागेत निशस्त्र मुले, महिला व पुरुषावर १६०० बंदुकीच्या फेरी झाडून जवळपास हजार लोकांचे बलिदान घेणारी घटना पण हे बलिदान व्यर्थ गेले नाही. यातून नव्या क्रांतिकारकांनी  जन्म घेतला. स्वातंत्र्याच्या आहुती मध्ये बलिदान झालेल्या देशभक्त नागरीकांना विनम्र अभिवादन !             

Image may contain: one or more people, motorcycle and outdoorदेशात ब्रिटिश धोरणाच्या विरोधात असंतोष पसरला होता देशभर स्वातंत्र्याचे वारे वाहत असताना पंजाब प्रांताने मोठी आघाडी उभी केली होती. ब्रिटीशां विरोधी पंजाब प्रांतात असंतोष पसरला होता. १० एप्रिल १९१९ ला अमृतसर येथे दोन क्रांतिकारकांची सुटके साठी  डेप्युटी कमिशनर यांच्या घरावर गेलेल्या मोर्च्यावर गोळीबार केला याचा पडसाद लगेच उमटले ब्रिटिश कार्यालये, बँक, टपाल व डाक कार्यालय सरकारी इमारती लक्ष केले.जाळपोळ, असहकार सुरु केला होता.  हा असंतोष सरकारने दडपण्यासाठी जमाव बंदी लागू केली होती.त्यामुळे शहरात फिरण्यास बंदी होती. त्याच वेळी  १३ एप्रिलला पंजाबी लोकांचा बैसाखी हा महत्वाचा सण होता.त्या निमित्त अमृतसर  येथील जालियन बागेत जवळपास २० हजार लोक जमले  होते. या लोकांवर जनरल मायकेल ओडवायर च्या आदेशा नुसार जनरल रेजिनाल्ड डायरने १५ मिनीटे गोळीबारी केली.१६५० गोळ्या खर्ची पडल्या.मशीनगनचा वापर केला.जीव वाचवण्यासाठी काहींनी तेथील विहीरीत उडया घेतल्या.यातून सव्वाशे मृत्युदेह बाहेर काढले तर हजार पेक्षा जास्त मृत्यू पावले. अनेक जण जखमी झाले. या नरसंहार बाबत डायरला ना खेद- ना खंत होती. त्याने या गोष्टीचं वर्णन मात्र हंटर आयोगा समोर शौर्य गाजविल्या सारखे सांगितले. तर पंजाब शासकांनी तर कहरच केला. इंग्लडच्या राणी ला प्रशंसेचे पत्र लिहीले. या घटनेनंतर देशातील स्वातंत्र्य लढा मोडण्याचे प्रयत्न झाले. अमृतसरचे पाणी तोडले. मारझोड, अटकसञ सुरु केले. रेल्वेचे तिसऱ्या श्रेणीचे तिकीट बंद करून प्रवास बंद केला. या अमानुषतेचा सुड मात्र त्यांच्या भुमीवर जावून २१ वर्षानी एक भरतभूमिचा पुत्राने घेतला तो महान क्रांतिकारक सरदार उधमसिंह होय.           

हा नरसंहार हिंदुस्थानात १८५७ च्या लढ्याची आठवण करुन  देणार होता. या घटनेने ब्रिटिश जितके आक्रमक झाले तितकेच क्रांतिकारक निर्माण झाले.या घटनेच्या शंभरीला इंग्लड पंतप्रधान थेरेसा ने दुःख व्यक्त करून लज्जास्पद व कलंकीत घटना आहे असे म्हणतात परंतु माफी मागत नाहीत.यापूर्वी १९९७ साली राणी एलिझाबेथ यांनी जालियन बागेला भेट देत आमच्या भुतकाळाच्या इतिहासातील हि दुःखद उदाहरण आहे असे म्हटले आहे. तर सन २०१३ मध्ये डेव्हीड कॅमेरून भेटी दरम्यान हत्याकांडास ते लज्जास्पद म्हणतात परंतू एक हि पंतप्रधान अथवा आधिकारी जाहीर माफी मागत नाही.  असे असले तरी हिंदुस्थान च्या स्वातंत्र्याचा व संस्कृती चा जगाला विसर पडत नाही. परंतू इंग्लड मध्ये लेबर पार्टीने मात्र भारताची माफी मागावी अशी स्पष्ट भुमीका घेतली आहे. पालमेंट मध्ये माफीची मागणी करुन हिंदुस्थानच्या वीरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहीली आहे.

जालियन वाला बाग घटनेत सरदार उद्यमसिंह जखमी झाला होते.या घटनेपुर्वी आई ,वडील, भाऊ सारे जग सोडून गेले होते.या घटनेला आदेश देणारा जनरल मायकेल ओडवायर जबाबदार असल्याचे ठाम मत होते. या घटनेचा उद्यमसिंह यांच्या मनावर परिणाम झाला.बदला घेण्यासाठी उद्यमसिंह यांनी १९३४ ला इंग्लंड गाठले. त्याने तिथे एक कारगाडी व पिस्तोल खरेदी केला. वेळ मिळेल तेव्हा संधी शोधली. असाच १३ मार्च १९४० चा दिवस उगवला.लंडन च्या कॅटसन हॉल मध्ये सभा होणार होती, त्या सभेत ओडवायर जातीने हजर होता व त्याचे भाषण होणार होते.त्याच्या जवळ जात भरसभेत भारतमंत्री झेटलँड यांच्या उपस्थितीत दोन गोळ्या झाडून वध केला.अखेर २१ वर्षा नंतर बदला पुर्ण झाला.अस्मिता व हिंदुस्थानियांच्या अंगातील रग अजुन संपली नसल्याचे दाखवुन दिले.अखेर उद्यमसिंह यांनी ३१ जुलै १९४० रोजी हसत हसत हौतात्म्य व स्विकारले. पुढे अनेक देशाभिमानी हिंदुस्थानियांच्या प्रयत्नांती हुतात्मा उधमसिंहांचे अवशेष १९७४ साली हिंदुस्थानात आणले गेले व सुनाम या त्यांच्या जन्मगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांच्या अस्थी सतलज नदीत विसर्जित करण्यात आल्या.

जालियनवालाबाग घटनेला शंभर वर्ष पुर्ण होत असताना सर्व भारतीयांना या घटनेचे स्मरण झाले पाहिजे तसेच प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांची स्मृती जागवल्या पाहिजेत. स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले नसून त्यासाठी मोठे बलिदान मोजावे लागले आहे. सुरवीरांचा इतिहास सांगितलं पाहिजे. बलिदानाची व त्यांची शौर्य चे आठवण झाले पाहिजे,स्वैराचाराने वागणाऱ्या युवा पिढीला सांगितली पाहिजे नाहीतर देशाचे तुकडे करू पाहणारी देशातील व देशाबाहेरील गिधाडे टपून बसली आहेत.


(विठ्ठल वळसेपाटील)
सणसवाडी
मो.नं : ९२२६३४२९६१
(लेखक ज्येष्ठ पञकार,समिक्षक तथा स्तंभलेखक आहेत.)

संबंधित लेख

  • 1

शिरूर तालुक्यात बाहेरील नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार झाला आहे, असे आपणास वाटते काय?
 होय
 नाही
 माहित नाही