निमगाव म्हाळुंगी - श्रावण...; ऊठ बळीराजा...

Image may contain: 1 person, standing, cloud, sky, shoes, grass, outdoor and natureश्रावण

हर्षाने आला श्रावण, घेऊन रिमझिम सरी।
हिरवळीचे तोरण बांधिले, सृष्टीच्या या दारी॥

रंगीबेरंगी पानांफुलांनी, सारी धरती नटे।
चिंब झालेल्या भुईतून, सृजनाचा हिरवा आविष्कार ऊठे॥

अदधभूत असा हा खेळ, ऊन-पावसाचा चाले।
किलबिलाट करूनी पक्षी, पानांफुलांशी बोले॥

पावसात भिजूनी पाखरे, ओलीचिंब झाली होती।
झाडावरल्या थेंबांचे, क्षणात जाहले मोती॥

वार्‍यासंगे ढगाआड दडलेला, सुर्य जागा झाला।
माथ्यावरती धरूनी कमान, इंद्रधनू आला॥

सुंदर असा हा महिना, नवचैतन्याने नटलेला।
गोडधोड जेवन अन्, सणावारांनी थाटलेला॥


ऊठ बळीराजा...

ऊठ बळीराजा,
लाग कामाला जोमानं।
सरीवर सर येईल धावून,
अंग भिजल घामानं॥

झाली थोडी गारपीट,
म्हणून काय झालं...?
हातामधलं नेलंय,
नशिबातलं थोडच गेलं॥

आले आभाळ भरून,
सुटला सोसाट्याचा वारा ।
चिंब भिजल हे रान,
येतील श्रावण जलधारा ॥

वापसा झाला शेतामधी,
पेरणी करण्या पाभार धरू ।
धरणी मायेच्या कुशीत,
नवे बिज हे पेरू ॥

बुडून गेला दिवस,
पाखरं विसावली घरट्यामधी ।
जगात कोणालाच तुझी,
सर येणार नाही कधी ॥

ऊठ बळिराजा,
असा हताश नको होवू ।
एकमेकां साथ देऊन,
गाणं शिवाराचं आपण गाऊ ॥

- कु. आकाश हरिभाऊ भोरडे
मु.पो.निमगाव म्हाळूंगी
ता.शिरूर, जि. पुणे 412209
मो.नं. 9156715275

संबंधित लेख

  • 1