रांजणगाव गणपती - आजचा शेतकरी बळीराजा की बळी पडलेला राजा

Image may contain: 1 person, smiling
"त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ ठिगळ,उभ्या आयुष्याला त्याच्या कसं फाटक आभाळ" "मला कसंस होतया कोणी बाबा म्हणताना,उरी हुंदका दाटतोया गोष्ट बापाची सांगताना" हि आहे आजच्या शेतकऱ्यांची व्यथा.

शेतकरी म्हटल की आपल्या डोळ्यासमोर येते ती गरिबी,दुष्काळ,कर्जबाजारी,अनुदानासाठी,सरकारवर अवलंबून असणारा आत्महत्या करणारा शेतकरी...! पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झाली...? ह्याला जबाबदार कोण ...? ह्याची कारणे व उपाय ह्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न कुणी केलाय का...?

खर तर शेती हा व्यवसाय पावसावर मुख्यतः हवामानावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे.भारतातील साधारणपणे ६० ते ७० टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते आणि ३० ते ४० टक्के शेती ही बागायती असते.त्यामुळे पाऊस कमी किंवा जास्त झाला तर त्याचा परिणाम शेतीवर होतो.तसेच अवकाळी पाऊस झाल्यास त्याचा सुद्धा पिकांवरती खुप मोठया प्रमाणात दुष्परिणाम होतो.अशा वेळी शेतकऱ्यांची सरकारकडून अनुदान,कर्जमाफी मिळण्याची अपेक्षा असते.ती न मिळाल्यास तो शेतकरी कर्जबाजरी होतो.त्यातून नैराश्य येते आणि तो शेतकरी आत्महत्या सारख्या वेगळ्याच मार्गाला जातो.आपला भारत देश हा ८० टक्के कृषिप्रधान आहे.भरपूर लोकांचा शेती हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे.त्यावरच त्याचा उदरनिर्वाह होतो.जर आपल्या या शेतकरी बांधवांने त्याच्या शेतात काही पिकवले नाही.तर आपण काय खाणार...? शेतकरी शेतात अन्नधान्य पिकवतो.म्हणुन जगातील लोक जिवंत आहेत.नाहीतर आपण कसे जगणार...?

पण त्या शेतकऱ्यांच्या या कष्टाला आणि मेहनतीला म्हणजेच त्याच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही.त्या शेतकऱ्यांला बऱ्याच नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते.जसे की कोरडा दुष्काळ,ओला दुष्काळ तर कधी वादळ यांच्यामुळे शेतीचे बरेच मोठया प्रमाणात नुकसान होते.त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला जातो.त्यामुळे आपला शेतकरी बांधव हा आत्महत्येचा मार्ग अवलंबतो.पण यावर आपण सर्वांनी एकजुटीने काहीतरी केलं पाहिजे.आपला हा शेतकरी बांधव रात्रंदिवस शेतात कष्ट करत असतो.म्हणुन तर"मेरे देश की धरती सोना उगले,उगले हिरे मोती मेरे देश की धरती".यांच्यासारख्या ओळी आपल्या ओठांवर सहज येतात.शेतकरी'सुखी तर देश सुखी जेथे राबती हात तेथे हरी'अशी शेतीच्या महतीची वचने आपण नेहमी ऐकतो,बोलतो आणि कौतुकाने लिहितो.परंतु शाळेत मध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना प्रश्न  विचारला जातो तुम्ही कोण होणार...? तेव्हा विद्यार्थी म्हणतात,मी डॉक्टर,इंजिनिअर,वकील होणार पण मी एक आदर्श शेतकरी होणार हे कोणाच्याच तोंडून निघत नाही.अस कोणीच म्हणत नाही मी माझे जीवन शेतीमध्ये झोकुन देणार आहे.शेती करणे म्हणजे दुय्यम काम करणे असा आजच्या नवीन पिढीचा द्रुष्टीकोण झाला आहे.

आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लाल बह्हादुर शास्त्री यांनी "जय जवान,जय किसान" असा नारा देत सैनिकांबरोबरचं शेतकऱ्यांचाही गौरव केला होता.पण त्या शेतकऱ्याच्या जीवनात त्याला येणाऱ्या दुःखाचा अडचणींनचा आपण कधीच विचार करत नाही.आपल्या या मातृभूमीसाठी,देशासाठी जसे सैनिक कायम डोळ्यात तेल घालून जस आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करतात.तसंच शेतकरी अन्नधान्य पिकवुन धरती सुजलाम सुफलाम करतात.शेतकरी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबतो.पण अनेक ठिकाणी दोन वेळचे अन्न ही त्याला पोटभर मिळत नाही.आणि ऐश आरामाचे आनंदाचे जीवनही तो कधीच जगत नाही.शेतकऱ्याच्या कोणत्याच पिकाला हमी भाव दिला जात नाही.त्यामुळे दलाल शेतकऱ्यांकडून शेतमाल कमी भावाने विकत घेऊन शहराच्या ठिकाणी किती तरी पटीने किंमत वाढवून विकतो.शेतमालांची बाजारपेठ ही शेतकऱ्याच्या हातात नसते.तिथेही दलाल आणि इतर लोक असतात.तेच शेतकऱ्याच्या मालाचे भाव ठरवतात.

एखादं जर उदाहरण सांगायचं झालं तर,कांदे आपल्या कडुन १० रुपये किलो ने घेतले. तर,संपूर्ण भारतभर १० रुपये  किलो ने विकले गेले पाहिजे.परंतु आज तसे होत नाही.शेतकऱ्याकडुन कांदा १० रुपये किलो ने घ्यायचा आणि मोठं मोठं शहरांसारख्या ठिकाणी तो जास्त किमतीत विकायचा.म्हणजे या मध्ये फायदा नक्की कोणाचा आहे...? हा प्रश्न पडतो.शेतकऱ्यांची आजची परिस्थिती खुप वाईट आहे.शेतकऱ्याला पीक हातात येण्याआधी खुप पैसे खर्च करावे लागतात.नांगरण्यासाठी,पेरण्यासाठी बियाणं आणण्यासाठी,पिकांची लागवड करण्यासाठी,नंतर खुरपण्यासाठी,त्यानंतर फवारणी,ह्या सर्व गोष्टींसाठी शेतकऱ्याला सुरवातीला खुप पैसा खर्च करावा लागतो.शेतीत पीक चांगले येण्यासाठी पाऊस असण गरजेचं आहे.जर जास्त पाऊस झाला तर त्याचा परिणाम त्या पिकावर होतो आणि पाऊस कमी झाला तरीही पाण्याअभावी शेतातलं उभं पिक जळुन जात.त्यामुळे पाऊस हा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत व्हायला पाहिजे.ह्या सर्व गोष्टी वेळेवर झाल्या तरचं शेतकऱ्याच्या पिकाचं योग्य पद्धतीने उत्पादन येणार आहे.शेतमालाला योग्य हमीभाव पण मिळायला हवा.

शेतकऱ्याला योग्य पीक काढण्यासाठी सुपीक जमीन लागते.तरच पीक चांगले येऊ शकत आणि जर शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य असते.तसेच हवामानात होणाऱ्या बदलांमुळे शेतीतील पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होते.हजारो रुपये खर्च करून वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांच्या फवारण्या करून शेतकरी शेतमाल तयार करतो.त्याची योग्य प्रकारे काळजी घेतो.पण त्या शेतकऱ्याच्या कष्टाला फळ मिळतेच असे नाहीच.आजच्या शेतकऱ्यांवर खुप बिकट परिस्थिती ओढावली आहे.त्यासाठी गरज आहे ठोस पाऊल उचलण्याची,पिकांना हमीभाव देण्याची तसेच कर्जबाजारीपणाचा बोझा कमी करण्याची.वाढत्या औद्योगिक वसाहतींमुळे मोठया प्रमाणात वृक्षतोड झाली आहे.त्यामुळेच पाऊसाचे प्रमाण कमी झाले आहे.आता आपल्याला वृक्षारोपणा बरोबरच वृक्षसंवर्धन करण्याची खुप गरज आहे.तरच निसर्गाशी आपली नाळ कायम राहील आणि आपला शेतकरी राजा सुखी राहील.पिकांचे व पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास शेतीमालाला भावही चांगला मिळेल.

शेतकऱ्याच्या ऊस व कांदा या पिकाचा अपवाद वगळता कोणत्याच पिकाला आज भाव नाही.शेतकऱ्यांच्या मालाच्या गाड्यांच्या गाड्या सडल्या जातात रस्त्यावर फेकल्या जातात.मग त्या शेतकऱ्याने जिवाच्या आकांताने कष्ट करून पिकवलेला शेतीमाल त्याच्या कष्टाची अशी राखरांगोळी होताना शेतकऱ्याला काय वाटत असेल.आज जर सांगायचं झालं तर बटाटा आज शुल्लक दराने विकला जातोय. टोमॅटोला तर भावच नाही.पण पॅकींग केलेले बटाटा वेफर्स,टोमॅटो वेफर्स,टोमॅटो सॉस ह्याचे भाव तर आकाशाला भिडलेत.किती तफावत आहे.हा न्याय असा का बरं.शेतकऱ्याच्या बाबतीत बरोबरीचा न्याय कधीच होणार नाही का...? गहू पिकवायचे शेतकऱ्याने नाव विविध कंपनीच,फळ पिकवायची शेतकऱ्याने नाव दुसऱ्याच कंपनीच,म्हशींना गाईंना चारा,पाणी,त्यांना वाढवायचं,हात दुखे पर्यत दुध काढायचं शेतकऱ्याने.आणि त्याला नाव अमूल दूध,गोकुळ दूध,ऊर्जा दूध,मग मला प्रश्न पडतो की.अमूल शेतकऱ्याच नाव नाही,गोकुळ त्याच्या म्हशीच नाव नाही,मग शेतकरी त्याच्या जिवाच्या आकांतान कष्ट करतो.पण त्याला त्या कष्टाच फळ कधीच त्याला मिळत नाही.का ही शेतकऱ्यांची अशी अवस्था...?

का...? शेतकऱ्याला त्याच्या कष्टाच फळ मिळत नाही.कधी ह्या शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच फळ मिळणार.ही जर परिस्थिती अशीच राहिली तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणत्याच पर्याय राहणार नाही.शेतकऱ्याला वाटत आमचे ही दिवस येतील.कारण चहा विकणारा भारताचा पंतप्रधान होतो.फळ भाजी विकणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो.तर आमचे ही दिवस येतील.अस वाटलं पण उलटच झालं.चहा विकणारा आजही आत्महत्याच करतोय.आणि फळ पिकणारा,भाजीपाला पिकवणारा आजही आत्महत्याच करतोय.ही दुर्दैवी परिस्थिती शेतकऱ्याच्याच बाबतीत का...? आजही आपल्या देशात मुली आत्महत्या करतात.का...? कारण हुंडा... आजही काही ठिकाणी मुलीचं लग्न करताना हुंडा द्यावाचं लागतो.पण आत्महत्या शेतकऱ्यांच्याच मुलीची होते.म्हणून शेतकरी कर्ज मुक्त झाला पाहिजे.हा मुद्दा कुठंच आढळत नाही.हेच शेतकऱ्यांच्या मुलीचं दुर्दैव.पण आज कहीही करायचं म्हंटल तरी शिक्षण ही काळाची गरज आहे.हे खरं आहे पण आम्हीही शेती करतो.आम्ही शिक्षण घेतो.अधिकारी व्हायच म्हंटल तरी शिक्षणच घ्यावं लागतं.पण सरकारने असा कायदा तयार करायला हवा.तो म्हणजे कोणतंही शिक्षण घ्यायचं असेल,नोकरी करायची असेल तर प्रत्येकाला दोन वर्ष शेती करावी लागेल.तरच नोकरी मिळेल.अस जर झालं तरच समाजातील लोकांना शेतकऱ्याच्या वेदना समजतील.शेतकऱ्याच्या कष्ट,मेहनत कळेल.

निवडणुकीत शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन भले ही तुम्ही जिंकत असाल पण शेतकऱ्याच्या नजरेत तुम्ही काळ्या आईला हरवताय.तुमच्या अशा वागणुकीमुळे समाजातल्या शेतकऱ्याला स्वतःच्या ताटातल्या अन्नाचा अपमान करताय.कांदा मार्केट मध्ये जाऊन पहा शेतकरी भाड्याचे पैसेही व्याजाने भरतोय.अहो शेतकरी फक्त कांदा पिकवतोय पण तुम्ही तर शेतकऱ्याच्या कांद्याच्या बाजारभावातही राजकारण करताय.राजकारणात विकास करण्याच्या नादात माणूस हरलाय काहीही झालं तरी नुकसान सहन करायला सर्वांना शेतकरी सापडलाय.तुमच्या ताटात कष्ट करून अन्न पाठवणारा शेतकरी राजा अभ्यास करून ही सांगता येणार नाही इतक्या वेळा जिवंतपणीच मरणयातना भोगतोय.दुष्काळातही घामाच्या पाण्यावर पीक उभं करायला शेतकऱ्यासारखी मर्दानी लागते.तुमच्या रोजच्या धावपळीच्या व्यापात रोजच शेतकरी आत्महत्या करतो.पण मतदान मिळवून जिंकलेल्या ज्या खुर्चीवर तुम्ही बसले आहात.त्यात एका मताचा शेतकऱ्याचा ही आधार आहे.शेतकरी फाटके तुटके कपडे घालून रात्रंदिवस कष्ट करत असतो.पण समाजासाठी त्यांना जगण्यासाठी अन्न पिकवण्यासाठी रात्रंदिवस शेतात राबत असतो.संपूर्ण जगाच पोट भरण्यासाठी स्वतः उपाशी राहून कष्ट करत असतो.

खरच भारतातला शेतकरी जगवायचा असेल ना तर शेतकऱ्याच्या पाठीशी उभ राहील पाहिजे.त्याच्या मनगटात बळ देणे आवश्यक आहे.माझा शेतकरी राजा शेतात घाम गाळून काबाडकष्ट करून शेती पिकवतो पण निसर्गाच्या लहरीपणामुळे हाताशी आलेल पिकाची जर नासाडी झाली तर कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो.त्याच्या मरणाचं भांडवल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांपासुन तर विरोधी पक्षापर्यत आणि समाजातील प्रत्येकाने आपल्या शेतकरी बापाला विसरू नका.ऊन-वारा पाऊस-धारा,अंगावर झेलून जीवनाच्या समस्या ओलांडणारा माझा शेतकरी.इमानदारीने काळ्या मातीच्या सेवेत रुजू झालाय.जगात असा कोणताही व्यवसाय नाही.की इतकी प्रचंड कष्ट करून इतका शुल्लक मोबदला.मध्यस्थ आणि वाहतूक व्यवस्था सरकार एवढंच जबाबदार आहे.तरीसुद्धा स्वतःच्या घरात अंधार करून दुसऱ्याच्या घरात प्रकाश निर्माण करतो.शेतकरी प्रकाश निर्माण करण्यासाठी पणतीची वात तयार करण्यासाठी शेतात शेतकरी कष्ट करून कापसाची लागवड करतो.स्वतःची मुलं बाळ उपाशी ठेवून दुसऱ्याच्या लेकरांसाठी भाजीपाला पिकवतो.

काळा पैसा बाहेर येण्यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली.पण ती नोटबंदी कसली आपल्या शेतकरी बापाची ती वाटबंदी होती.शेतकऱ्याला शेती करण्यासाठी १४ टक्के पर्यत व्याज भराव लागत.याला जबाबदार कोण...? या देशाचे पंतप्रधान,या राज्याचे मुख्यमंत्री,शासकीय अधिकारी,मोठे मोठे उद्योगपती का राजकीय पुढारी नक्की कोण...? या शेतकऱ्याच्या कर्जाला कारणीभूत आहेत.या देशात अनेक बँक उदयाला आल्या.या सगळ्या बँकांनी या देशातील सर्व व्यावसायिक,पदाधिकारी,राजकारणी या सर्वांना कोट्यवधी रुपयांची कर्ज घेतली आणि बुडवली.पण जर एखाद्या शेतकऱ्याच्या सातबारा उतारा वर जर कर्ज असेल तर बँक त्याची जमीन ताब्यात घेती आणि म्हणुन शेतकऱ्यांना खाजगी सावकारकडे जावं लागत.आज महाराष्ट्रातला शेतकऱ्यावर 3 लाख रुपये कर्ज असेल तर शेतकरी आत्महत्या करतो.तर महाराष्ट्र सरकारवर कोट्यावधींच कर्ज आहे.मग महाराष्ट्रातला एखादा मंत्री किंवा आमदार का आत्महत्या करत नाही.मग विकास नक्की झाला तरी कोणाचा...? रोजच पोट भरण्यासाठी रात्रंदिवस काबाडकष्ट करणारा जगाचा पोशिंदा असे वाक्य ज्याच्यासाठी वापरले जाते.तो शेतकरी मात्र कायमच विकासापासुन वंचित राहिला.

शेतकऱ्याचे माल रस्त्यावर पडलेत,सडलेत त्यांना बाजार नाही.शेतकऱ्याने कष्टाने पिकविलेल्या कर्ज काढून पिकवलेल्या शेतमालाला आज बाजार नाही.काय आहे त्या शेतकऱ्यांची अवस्था.आपण शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाची बाजारात गेल्यावर किंमत ठरवतो.पण जर आपण एखाद्या कपड्याच्या दुकानात गेले,दवाखाण्यात गेले,हॉटेल मध्ये गेले,फिरायला गेले,मॉल मध्ये फिरायला गेले तर लोक पैशाचा विचार करत नाही त्याचा कमी जास्त भाव करत नाही जो भाव आहे त्या भावात खरेदी करतात.मग शेतकऱ्याच्या मालाबद्दल का असा विचार करतात.बाजारात जर एखादी वस्तू १५ रुपये पावशेर असेल तर ती आपण १० रुपये पावशेर द्या अस आपण बोलतो का...? पण जर मेथीची गड्डी १० रुपये या दरात असेल तर घेणारे बोलतात कमी करा ना...? हाच प्रश्न आपण बाकी कोणाच्याच विषशी बोलत नाही.पण मग शेतकऱ्याच्याच मालाचेच हे असे भाव का ठरवले जातात.शेतकरी रात्रंदिवस उन्हातान्हात कष्ट करून अन्नधान्य पिकवतो आणि बाजारात नेल्यावर त्याचा कमी दरात भाव करून तो शहरांसारख्या मोठया मोठ्या ठिकाणी परदेशात नेऊन तो जास्त किमतीत विकला जातो. शेतकऱ्याची अशी दयनीय अवस्था बदलणार तरी कधी शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव करण्याचा अधिकार मिळणार तरी केव्हा.

जर प्रत्येकाला वाटेत असेल शेतकरी जगला पाहिजे.तर शेतकऱ्याचे दुःख, कष्ट समजुन घ्या.त्याच्या मालाला योग्य भाव द्या.तरच शेतकरी वाचेल.नाहीतर समाजाची राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही.शेतकरी हाता पायांच्या काड्या करून जिवाच्या आकांतात शेतात राबत असतो.शेतकऱ्याला माहिती नसत पाऊस येईल न येईल तरीही हजारो रुपये मातीत गाडतो.माती बरोबर जुगार खेळतो.सगळ्या जगाला जगवण्यासाठी राब राब राबतो.खरच या शेतकरी राज्याची मरणाबरोबरच सांगड आहे.तसेच सरकारचे वेगवेगळे कर व कायदे यामुळे शेतकऱ्याच्या एकूण उत्पादनांपैकी १० टक्के ही उत्पन्न शेतकऱ्याला मिळत नाही.पण शेतकऱ्याच्या नफ्यावर चटवलेला सर्व नियम कायदे खिशात घालून फिरणारा आणि पैशाने लाले लाल झालेला व्यापारी शेतकऱ्याला पिळत असतो.शेतकऱ्याच्या  कष्टाला अजिबात किंमत नाही.शिवाय शेतकऱ्याला बऱ्याच नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते.मग सांगा या शेतकऱ्याने जगायचं कस.शेतकरी म्हणजे काळ्या आईच लेकरू आहे,शेतकरी म्हणजे काळ्या आईचा पोशिंदा,शेतकरी म्हणजे काळ्या मातीत घाम गाळून मोती पिकवणारा बळीराजा होय.शेतकरी काबाडकष्ट करतो,घाम गाळतो,माती मध्ये सर्वस्व पणाला लावून हिरवीगार अशी शेती फुलवतो.परंतु शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्याच्या कष्टानुसार भाव मिळत नाही.

शेतकरी करतो काय,शेतकरी रक्ताचं पाणी करतो,हाडाची काड करतो.तरीही शेतकरी खऱ्या अर्थाने उभा रहात नाही.कारण शेतकरी जगाचा अन्नदाता,जीवनदाता आहे.शेतकरी सगळ्या लोकांचा अन्नदाता झाला.परंतु शेतकऱ्यांचा आधारदाता कोणीच झाला नाही.आज या शेतकऱ्यांचा आधारदाता होण्याची गरज आज खऱ्या अर्थाने आहे.शेतामध्ये माझी झोपडी तिला बोराटीची झाप,तिथं राबतो कष्टकरी शेतकरी माझा बाप,घेतो अंगावर चिंध्या जगा मिळाया साखर,एवढी किमया करणारा शेतकरी बाप इथं उपाशी आहे.शेतकरी बाप आपल्या मुलांचे चांगले शिक्षण पूर्ण करू शकत नाही त्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही.अहो या शेतकऱ्याचं दुःख जर कोण सोडवू शकत असेल.तर तो शेतकरीच शेतकऱ्याचं दुःख सोडवू शकतो.म्हणून तुमच्या सारख्या शेतकऱ्यांना एकच सांगेल.हा संघर्ष शेतकऱ्यांच्या जिद्दीचा आहे.आगीसारखं जगायचं.आपण रस्त्याने चालताना काटे पाहून रडायचं नाही.तर तिथून आधार घ्यायचा.नवीन ऊर्जा निर्माण करायची.आणि हीच भूमिका शेतकरी बांधवांनी घ्यावी.आणि परत एकदा मातीमध्ये सोन पिकवण्याची हिंमत दाखवावी.

सोन्यासारखा भाव आपल्या मातीला आपल्या त्या पिकाला आला पाहिजे.यासाठी सर्व तमाम शेतकरी बांधवांनी आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी एकमेकांना प्रोत्साहन दिल पाहिजे.जगाची भाषा शिकली पाहिजे.जगामध्ये शेतीसाठी काय काय नवीन तंत्रज्ञान आलंय हे शिकलं पाहिजे.जेव्हा आपण हे ज्ञान शिकू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण शेतकरी बांधव उभे राहिल्याशिवाय राहणार नाही.शेतकरी बांधवांनो तुम्हीच जगाचे समाजाचे अन्नदाते आहात. शेतकरी म्हणजे मातीचे घरटे,शेतकरी म्हणजे सळसळती तलवार,तीच तलवार घेऊन दुष्मनांना मातीत घाला.आणि आपण स्वतः नांगर घेऊन मातीमध्ये सोन पिकवा.ही जर किमया कोण करत असेल तर तो शेतकरी राजा आहे.माझा जवान 'माझा किसान शेतकरी करू' शकतो.एवढं जरी शेतकऱ्यान केलं तरी शेतकरी नक्कीच सुधारेल.तर शेतकरी पण सर्वात श्रीमंत बनेल.एवढी ताकत शेतकऱ्यामध्ये आहे.तुम्ही आता जिंकणार आहात.तुमचा जन्म जिंकण्यासाठीच झाला आहे.म्हणून माझ्या तमाम  शेतकरी बांधवांना तुमची एक कन्या म्हणुन तुमची एक हितचिंतक म्हणून मी सर्वांना विनंती करते.आता सर्व शेतकरी बांधव एकत्र याआणि शेती योग्य पध्दतीने करा.

किरण दिपक पिंगळे, मो ७५०७८७१४८२
रांजणगाव गणपती


  
  


संबंधित लेख

  • 1

शिरूर तालुक्यातील वाळू तस्करांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे काय?
 होय
 नाही
 माहित नाही