सविंदणे - शाहीर गुलाब झेंडे यांनी रचलेला पोवाडा !

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर सविंदणे येथील शाहीर गुलाब झेंडे यांनी रचलेला पोवाडा -
व्हि़डिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अण्णा हजारे आगे बढो तुम-आम्हीही तुमच्या साथीला ।
जन आंदोलन चालूच ठेवू-गोळ्याही झेलू छातीला ।।

लोकपाल विधेयकासाठी जेल भरो सब जायेंगे
अण्णा साहेबांचा एकच नारा विजयी करके दिखायेंगे
उपोषण खडतर तेही निरंतर-भले देह मिळाला मातीला ।।१।।
जन आंदोलन चालूच ठेवू-गोळ्याही झेलू छातीला

भ्रष्टातार या भारत देशी कोण कसा ना कुणा कळे
एक होऊनी लढूया सारे उखडून टाकू पाळे-मुळे
गल्ली ते दिल्ली गर्जना आजची-प्राणही त्यासच ओतीला ।।२।।
जन आंदोलन चालूच ठेवू-गोळ्याही झेलू छातीला

सत्यासाठीच झगडूया सारे सत्य शेवटी टिकणारे
भ्रष्टाचारी हे मंत्री आजचे भारत देशा विकणारे
(म्हणे) सुजलाम सुफलाम देश करूया-मानाल का त्याच्या बातीला ।।३।।
जन आंदोलन चालूच ठेवू-गोळ्याही झेलू छातीला

परदेशांमध्ये अभ्यास करती लोकपाल विधायक पुरा
भारत देशी अण्णा हजारे स्वताःच वाही त्याची धुरा
मंजुरी द्यावी, आमलात घ्यावी लोकपालाच्या ज्योतिला ।।४।।
जन आंदोलन चालूच ठेवू-गोळ्याही झेलू छातीला

प्रति महात्मा गांधी म्हणती अण्णा हजारे नावं पुढे
सत्यासाठीच त्यांची लढाई अन्यायाच्या विरुद्ध लढे
निस्वार्थी जीवन हे जगती तुलना ना त्यांच्या ख्यातीला ।।५।।
जन आंदोलन चालूच ठेवू-गोळ्याही झेलू छातीला

महागाईने तर कहरच केला, नको-नको जीवन झाले
सरकारच्या त्या योजनने पुढती सांगा कुणाचे ते चाले
आत्महत्या शेतकरी हे करती, महाग झाले रोटीला ।।६।।
जन आंदोलन चालूच ठेवू-गोळ्याही झेलू छातीला

संत यादव बाबांची कृपा चालना अण्णा साहेबाला
जसे मालुसरे तान्हाजी सांगे राजे आपल्या शिवबाला
कोंढाणा किल्ला काबीज करूया, आजच आजच्या रातीला ।।७।।
जन आंदोलन चालूच ठेवू-गोळ्याही झेलू छातीला

अण्णा हजारे यांचे वाईक झेंडे कवी गाव सविंदणे
सामील व्हा या शुभ कार्यास्तव एकत्र या सर्वांना म्हणे
चालना देऊ, तेवत ठेवू, विधायकाच्या त्या वातीला ।।७।।
जन आंदोलन चालूच ठेवू-गोळ्याही झेलू छातीला


- शाहीर गुलाब झेंडे
9970585353, 9860486527

(पोवाडा आपल्याला आवडला असल्यास आपली प्रतिक्रीया नोंदवा)

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही