कवठे यमाई - मरिआई देवीच्या कृपेने आलेली संकटे दूर होतील!

कवठे येमाई, ता. १७ नोव्हेंबर (सुभाष शेटे) - मरिआई देवीच्या कृपेने आलेली संकटे दूर होतील, देवी मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करेल, जो कोणी देवीचा भक्त देवीला दानधर्म करेल त्याच्या सर्व मनोकामना देवी पूर्ण करेल. आगामी सन 2012 ची संक्रांत रविवारी 15 तारखेस येत आहे. कोल्हापूर तुळजापूर येथे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या मरिआई देवीच्या भक्तांसमोर शिवु महाराज यांनी कथन केलेल्या भविष्यवाणी नुसार, 2012 च्या जानेवारी महिन्यातील 12 तारखेस 9 खंडांपैकी 1 खंडाचा अस्त होणार आहे, असे भाकीत वर्षानुवर्षे व पिढीजात चालू असलेली मरिआई देवीचा देव्हारा घेऊन गावोगावी फिरून आपल्या प्रपंचासाठी जमलेल्या देवीच्या भक्तांसमोर आपल्या उघड्या शरीरावर चांगल्या जाडजूड चाबकाचे रक्त निघेपर्यंत जोरदार फटके मारून उपस्थितांना देवीसाठी दानधर्म करण्याचे आवाहन करणारे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्‍यातील पेनुर गावचे मूळ रहिवासी असणारे रामा निंबाळकर आज ही वयाच्या साठीत उघड्यावरचे आयुष्य जगत आहेत.

वर्षानुवर्षे चालत आलेली मरिआई देवीचा देवारा डोक्‍यावर घेत गावागावात जाऊन ठिकठिकाणी मरिआई देवीच्या देव्हा-या समोर कंबरेखाली एक विशिष्ट पेहराव. हातात चाबूक, पायात जाडजूड घुंगराच्या माळा, बाजूला ढोल वाजवीणारी त्यांची पत्नी साखराबाई. दोन अन्य सहकारी श्‍यामराव देवकर व त्यांचा मुलगा किसन देवकर यांच्या साहाय्याने देवीच्या देव्हा-या समोर ढोलाच्या तालावर नृत्य करतात. चाबकाचे फटके अंगावर घेत हातात सूप व त्यात भक्तांनी दान दिलेले धान्य, पैसे ठेवत सूप फिरवत उपस्थित भक्तांना धार्मिक सूचना करतात. देवीची सेवा करीत व त्या माध्यमातून मिळणारे धान्य, पैसा यांच्या साहाय्याने आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत.

गावाजवळील उजाड माळरानावर पाले ठोकून सकाळीच उठून मरिआई देवीचा देव्हारा व सहका-यांना बरोबर घेत पुर्वजांकडुन देवीच्या खेळासाठी वतन मिळालेल्याच गावात जाऊन मरिआई देवीचा खेळ करणे व त्यातून मिळणा-या दानधर्मातुन उदरनिर्वाह चालविणे हे एकच धेय. साधारणतः: 15 मरिआई वाल्यांची कुटुंबे सध्या कवठे येमाई ता.शिरूर येथे वास्तव्यास आहेत. प्रत्येक कुटुंबास परिसराचा भाग मरिआई देवीच्या खेळ करण्यासाठी विभागला आहे. हद्द सोडून दुस-याच्या हद्दीत जायचे नाही पण संध्याकाळी मात्र सर्वांनी एकत्रित वस्ती करून राहायचे. दरवर्षी नवरात्री नंतर दस-यास श्रीगोंदा तालुक्‍यातून सर्वांनी आपापल्या मिळालेल्या परिसरात देवीचा देव्हारा घेत खेळ करण्यास सुरवात करतात. 3 महिन्यानंतर शिरूरसह आंबेगाव तालुक्‍यातील गावातून मरिआई देवीचा देव्हारा नाचवत, मिरवत आलेल्या दानधर्मातुन गुजराण करायची, हा ठरलेला दिनक्रम. उर्वरित नऊ महिने देखील महाराष्ट्रातील इतर भागात जाऊन ह्याच प्रकारे कार्यक्रम पार पाडायचे ही रामा निंबाळकर या मरिआई वाल्याच्या तांड्यातील इतर कुटुंबांचीही व्यथा. आणि हो, हे सर्व करताना बारा ही महिने पायी प्रवास करताना ही सर्व मंडळी उघड्यावरचे आयुष्य जगतात हे ही तितकेच खरे.


संबंधित लेख


वाघाली येथील रस्ता दुरूस्तीचे विकासकाम नक्की कोणाचे?
 ऍड. अशोक पवार
 बाबूराव पाचर्णे
 प्रशासन
 अन्य