वाघाळे - हसऱया चेहऱयाचा भावनाशील माणूस आता राजकरणात!

तरुणात-तरुण, म्हाताऱयात-म्हातारा, बालगोपाळांत लहान बनणारा, प्रत्येक माणसाच्या मनात घर करून ठेवणारा, नेहमीच हसत मुखाने प्रत्येकासमोर जातात ते म्हणजे नाना ऊर्फ लक्ष्मण कुंडलिकराव थोरात.

नानांची जन्मभूमी वाघाळे तर व्यवसायानिमित्त सध्या वास्तव्य चंदननगर. चंदननगर येथे वास्तव करीत असतानाही ते आपला तालुका, आपली माणसे विसरले नाहीत. शिरूर तालुका कला-क्रीडा मंच, पुणे या नावाने ३-४ दिवसांचे कार्यक्रम मागील ४ वर्षे चंदननगर परिसरात त्यांनी घेतले आहेत. शिरूर परिसरातील नागरिकांना एक व्यासपिठ व एकत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. 'कलासागर प्रतिष्ठान'च्या नावाने गरजू विद्यार्थ्यांची फी, गणवेश व शालेय साहित्य वाटप केले. वाघाळे येथील कालिकामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांना १५ लॅपटॉपचे वाटप केले.

ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकीत शाळेबरोबरच कॉलेज सुरू करण्याचे नागरिकांना वचन दिले होते. एक वर्षाच्या आतच गावात कॉलेजची परवानगी आणली. ग्रामस्थांचे अथक परिश्रम व सर्वसामान्य नागरिकांची साथ व लोक सहभागातून कॉलेजचे बांधकामही पूर्ण केले.

नाना हे एक पत्रकारही आहेत. 'ऋणानुबंध प्रकाशना'च्या माध्यमातून त्यांनी सात वर्षे विविध सामाजिक विषय घेऊन पाक्षिक चालवले. आदरणीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते सदरचे पाक्षिक शासनास प्रदान केले. सदर पाक्षिकाचे ते कार्यकारी संपादक होत. कवी मनाच्या नानांना सामाजीक कार्याची गोडी आहे, हे वेगळे काही सांगायला नको. १९९९ साली मोठ्या अपघातातून बचावलेला नाना आता फक्त हसतात न म्हणतात हे आहे 'बोनस लाईफ' !

कोणत्याही सामाजिक कामात नाना नेहमीच पुढे असतात. दुसऱयाने सांगितलेले काम करून घेण्यात व ते काम स्वतःचे आहे असे समजून करण्यात नाना नेहमीच पुढे असतात. 'आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते हे नानाचे मेव्हणे. ते माझे दाजी आहेत, हे नाना आपल्या तोंडून कधीच सांगत नाहीत. नाना म्हणतात, 'मंत्र्याचा मेहुणा' अशी माझी ओळख सांगितली तर मला कोण ओळखणार? नानांचा हाच प्रश्न सर्व काही सांगून जातो. चंद्रपूर-नागपूर-भंडारा येथे नक्षलवाद्यांच्या परिसरात जाऊन मोसी खुर्द येथे धरण-कॅनॉलचे काम असो वा सिंहगड सुधारणेचे काम नाना मनापासून करताना दिसतात.

तालुक्यातील प्रत्येक गावात हक्काची पाच घरे, असा नानांचा मित्र परिवार. जुलै १९९९ पर्यंत राजकणरात असलेले नाना आता पुन्हा हसऱया चेहऱयाने शिरूर तालुक्यातील राजकरणात दिसणार आहे.

- सुहास ऊर्फ बाळासाहेब काटे, अध्यक्ष, शेतकरी संघटना, शिरूर.

(जाहिरात पुरस्कृत)

संबंधित लेख


वाघाली येथील रस्ता दुरूस्तीचे विकासकाम नक्की कोणाचे?
 ऍड. अशोक पवार
 बाबूराव पाचर्णे
 प्रशासन
 अन्य