कोंढापुरी - मैत्री!

मैत्री म्हणजे काय असतं?
सुख-दुःखाच्या वेळी कामी येणारं नातं असतं,

मैत्री असते निखळ आणि प्रेमळ
त्यात नसते कसलीच अडथळ,

मैत्री असते प्रेमाचा सागर
त्यात नसतो द्वेश-मत्सर,

मैत्रीत नसतो कसलाच भेदभाव
फक्त असावा लागतो, चांगला स्वभाव,

अशी असावी मैत्री प्रेमळ
जिथे नांदतो सुखाचा दरवळ!


शाळा!
शाळा म्हणजे एक वेगळेच तत्व
जेथे खुलते आपले व्यक्तिमत्तव,

शाळा म्हणजे ज्ञानाचा वर्ग
जेथून मिळतो यथाचा मार्ग,

शाळा म्हणजे प्रगतीचे पाऊल
जेथून मिळते नव्या दिशांची चाहूल,

शाळा म्हणजे एक नाविण्यपूर्ण कला
जशी की विद्याधाम प्रशाला!

- क्षितिजा मनोज गायकवाड, इयत्ता नववी.


- शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी केलेल्या कविता, गाव, शाळेवर लिहीलेला निंबध या सदरातून प्रसिद्ध केले जातील. आपण फक्त आमच्या ई-मेल वर आपल्या कविता व आपला फोटो पाठवावा.
संपर्क- shirurtaluka@gmail.com, अथवा गणेश पवार- ९७६६७३२७२९

संबंधित लेख

  • 1

पुणे-नगर रस्त्यावर ठराविक काळात अवजड वाहनांना बंदी घालणे योग्य आहे का?
 होय
 नाही
 माहित नाही