कृषीविभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- इंगळे

शिरसगाव काटा, ता. 8 जुलै 2015 (सतीश केदारी)- कृषीविभागाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडल कृषी अधिकारी साजना इंगळे यांनी केले. येथे कृषी जागृती सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
(छायाचित्र पाहण्यासाठी इथे क्लिक करा)

या प्रसंगी कृषी पर्यवेकक्षक दादासो झिंजुर्के, कृषी सहाय्यक अंकुश परांडे, सहाय्यक जगताप व शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शासनाच्या कृषी विभागांतर्गत गांडुळ खत प्रकल्प, शेततळी, फळबागा लागवड आदी योजना राबविल्या जात आहेत. जमिनीचा पोत सुधारन्यासाठी व खतांच्या योग्य मात्रेसाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घ्यावे, असे असे मत इंगळे त्यांनी व्यक्त केले.यावेळी कृषी सहाय्यक जयवंत भगत यांनी ऊसाचे एकरी उत्पादनवाढीसाठी बेनेप्रक्रिया, तननियंत्रण, खत व्यवस्थापन, लागवडीची माहिती उपस्थितांना दिली.

शिरूर च्या पुर्वभागातील वडगाव रासाई, कोळगांव डोळस, कुरुळी, शिरसगाव काटा, सादलगाव, निर्वी आदी ठिकाणी थेट बांधावर भेट घेउन शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या पदधिकाऱ्यांनी समस्या जाणून घेतल्या व  मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
'शेतकऱयांनी पंचायत समितीच्या योजनांचा लाभ घ्यावा'
निमोणे,
ता. 4 जुलै 2015
(तेजस फडके)- 'शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती घेऊन लाभ घेणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस गॅसचे दर वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांनी गोबर गॅसचा वापर वाढविला पाहिजे, असे प्रतिपादन शिरुर पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकारी अनुराधा म्हसे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ ते ७ कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शिरुर तालुका कृषी विभागाच्या वतीने संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावात कृषी अधिकारी शेतकऱ्यांना ऊस, डाळींब व इतर पिंकाविषयी माहिती व मार्गदर्शन करत आहेत. शुक्रवारी (ता. ३) निमोणे व शिंदोडी येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी सहायक जयवंत भगत यांनी शेतकऱ्यांना ऊस व्यवस्थापन व उत्पादन वाढीविषयी मार्गदर्शन केले.

पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकारी अनुराधा म्हसे,  कृषी विभाग अधिकारी आर जे शिंदे, दादासो झिझुर्के, श्री. वाघचौरे, कृषी सहायक अंकुश परांडे, जयवंत भगत, संतोष बेन्द्रे, गावचे पोलिस पाटील भास्कर ओव्हाळ, माजी सरपंच रंगनाथ वाळून्ज, इंद्रभान ओव्हाळ, जालिंदर ओव्हाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या