शिक्रापूरमधून पुणे-शिर्डी साई पालखीचे प्रस्थान...

शिक्रापूर ता. 24 जुलै 2015- श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे ते शिर्डी अकरा दिवस पायी पालखी सोहळ्याचा दुसरा मुक्काम नुकताच शिक्रापूर येथे पार पडला असून या पालखी सोहळ्याचे शिर्डीच्या दिशेने साई नामाच्या गजरात मोठ्या थाटात व उत्साहात प्रस्थान करण्यात आले आहे.

श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे यांच्या वतीने प्रत्येक वर्षी गुरुपोर्णिमा उत्सवानिमित्त श्री साई पालखीचे आयोजन करण्यात येते. पालखीचे हे सत्ताविसावे वर्ष असून या पालखीचे पुणे कसबा पेठ येथून मूळ प्रस्थान झाले आहे. या ठिकाणाहूनच संपूर्ण पालखीला अध्यक्ष शाम वीर व अरुण वीर यांच्या वतीने फुलांनी सजावट करण्यात आली होती. पालखीच्या दुसऱ्या मुक्कामाचे नियोजन शिक्रापूर येथे गजानन मंगल कार्यालय व इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय या ठिकाणी जयवंत विरोळे व बाबासाहेब सासवडे यांच्या वतीने करण्यात आले होते. शिक्रापूर येथील समस्थ मांढरे परीवारांतर्फे पालखीच्या स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. शिक्रापूर येथे पालखी येत असताना जागीजागी अनेक कंपन्या, ग्रामस्थ व अनेकांच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी नाश्ता, चिवडा, केली व चहा पाण्याची मोठी व्यवस्था करण्यात आली होती.

शिक्रापूर येथे साई बाबांच्या आरती बरोबर साई भक्ती गाण्यांचा कार्याक्रमचे देखील आयोजन करण्यात आले होते. सकाळी पालखीचे शिर्डीच्या दिशेने टाळ मृदुंगाच्या गजरात प्रस्थान होत असताना संपूर्ण शिक्रापूर परिसर साई नामाच्या गजरात भक्तिमय झाला होता. यावेळी गावातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वर्षी पालखी सोहळा समितीने स्वच्छतेसाठी दहा लाख रुपये किमतीचे मोबाईल स्वच्छतागृह सोबत घेतले असून, विशेष म्हणजे जागोजागी व्यसनमुक्तीचे कार्यक्रम देखील या वर्षी राबविण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी मुक्काम करीत पालखी २९ जुलै रोजी शिर्डी या ठिकाणी पोहोचणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या