आंबळेजवळ एसटी अपघातात वीस प्रवासी जखमी

आंबळे, ता. 29 जुलै 2015- चौफुला-शिरूर या एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी बस झाडावर आदळल्याने चालक-वाहकासह वीस प्रवासी जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या गावाजवळ सुमारास अपघात झाला.

जखमींची नावे पुढीप्रमाणे-

संतोष सुखदेव गायकवाड (एसटी चालक, रा. कुरुंद, ता. पारनेर), यशवंत बापूराव धुमाळ (रा. पिंपळे धुमाळ, ता. शिरूर), समर्थ संतोष सरोदे व सारिका संतोष सरोदे (दोघे रा. सरदवाडी, ता. शिरूर), जयश्री तीर्थप्रसाद अनंतवाडकर (वाहक, रा. नगर), दत्तात्रेय सुभाष शिंदे (रा. न्हावरे, ता. शिरूर), रामा सुग्राव ढावरे, रंभाबाई रामा ढावरे (दोघे रा. वडगाव रासाई, ता. शिरूर), पांडुरंग गणपत रासकर (रा. कोंढापुरी, ता. शिरूर), निर्मला अशोक भांडारकर (रा. पारनेर), किशोर दगडू चव्हाण, राजेंद्र सुधाकर कुंजीर (दोघे रा. शिरूर). जखमींवर शिरूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दीक्षा संतोष सरोदे (रा. सरदवाडी), कल्पना सोपान आंबोरे, सोपान संपत आंबोरे (दोघेही रा. कर्डे, ता. शिरूर), सिद्धी विनायक भांडारकर (रा. पारनेर), विद्या बाळासाहेब गिरिगोसावी, तेजश्री संदीप जेजुरकर, कोमल भोसले व आणखी एका अशा आठ जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौफुला-शिरूर ही बस (एमएच 20, डी 8603) घेऊन चालक गायकवाड हे शिरूरकडे येत होते. आंबळ्याजवळ त्यांचा बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या विरुद्ध दिशेला घसरत जाऊन झाडावर आदळली. यात बसचा दर्शनी भाग चेपला जाऊन चालक-वाहकासह पाच प्रवासी गंभीर; तर 15 किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती समजताच शिरूरचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर, शिरूरचे आगार व्यवस्थापक मुकुंद नगराळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या