'वाहतूककोंडी कमी करण्यासाठी कामगारांची मदत घेणार'

रांजणगाव गणपती, ता. 9 ऑगस्ट 2015- पुणे-नगर रस्त्यावरील दिवसेनंदिवस वाढत चाललेली वाहतूककोंडी दूर करण्यासाठी कंपनी कामगार व स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार आहे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी सांगितले.

रांजणगाव एमआयडिसी येथे कंपनी अधिकारी यांच्या बैठकीत जाधव बालत होते. यावेळी रांजणगाव इंडस्ट्रिज असोसिएशन व सायन व्हिजेलंट सव्र्हिसेस प्रा.लि यांच्या संयुक्त विद्यमाने एमआयडिसी पोलिसांना राञी गस्त घालण्याकरिता देण्यात आलेल्या ‘पेट्रोलिंग गाडी’च्या चाव्या व वाहतूककोंडी कमी करण्यासाठी देण्यात आलेले 20 ट्रफिक वॉर्डन यावेळी जाधव यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, रांजणगावचे पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, शिरूरचे भगवान निंबाळकर, सुनिल क्षीरसागर, रांजणगाव इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष राकेश बावेजा, सचिव आर. डी. चौधरी, संचालक महेंद्र पाटील, अनिल जैन, पालेकर व अधीकारी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, कंपनी उद्योजकांच्या अडचणीं व तक्रारी याबाबतची दखल तातडीने घेतली जाणार आहे. कंपनी अधिकारयांनी याबाबत थेट संपर्क साधावा. नाशिक येथील कुंभमेळयानंतर येथील पोलिस ठाण्याला असणारी मनुष्यबळाची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या ट्रफिक वॉर्डनमुळे रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होर्इल. अशा कामासाठी स्थानिक तरूणांनी पुढाकार घेतल्यास पोलिसांकडून त्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहनांची हवा सोडा
पुणे-नगर मार्गावर अनेक ठिकाणी चुकीच्या बाजूने (रॉंग वे) वाहने येतात. त्यामुळे अपघात होतात. याबाबत कारवाईची मागणी अनेकांनी केली. त्यावर "चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहनांच्या टायरमधील हवा सोडा' असा उपाय जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी पोलिस व वॉर्डनला सांगितला. केवळ कठोर कायदे करून किंवा शिक्षा, दंड गोळा करून वाहतुकीची समस्या सुटू शकत नाही, काही वेळा असा चमत्कार दाखवूनही शिस्त लागू शकते, असे ते म्हणाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या