...तर मंडळांवर खंडणीचे गुन्हे दाखल करू- श्रीकांत कंकाळ

शिक्रापूर, ता. 14 सप्टेंबर 2015 (शेरखान शेख)- गणपती उत्सवातील देखावे व इतर अतिरिक्त खर्च टाळून दुष्काळ ग्रस्थांना मदत करा असे आवाहन शिक्रापूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सर्व गणपती मंडळांना केले आहे.

गणपती उत्सवानिमित्त शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या वतीने या भागातील गणपती मंडळांच्या बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते यावेळी कंकाळ बोलत होते. शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतिल सर्व गावांमध्ये पोलिस स्टेशनच्या वतीने प्रत्येक गावांमध्ये बैठका आयोजित करण्यात येत आहे. गणपती मंडळांची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे असणे गरजेचे असून, सध्या सर्व गावांनी 'एक गाव एक गणपती'साठी प्रयत्न करावा असेही कंकाळ यांनी सांगितले.

गणपती मंडळांनी कोणतीही तक्रार येऊ देऊ नये व सर्व गणपती मंडळांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. गणपती उत्सव काळामध्ये कोठे संशयित व्यक्ती किव्हा वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. यावेळी सर्व पत्रकार बांधवांना बरोबर घेत आदर्श गणपती मंडळांना गणपती पुरस्कार देखील देण्यात येणार असून, सर्व मंडळांनी शांततेत उत्सव साजरे करावे असेही कंकाळ यांनी सांगितले आहे.

गणपती उत्सव काळामध्ये सर्व मंडळांनी परवानगी घेणे गरजेचे आहे. कोठेही डीजे किवा मोठमोठे स्पीकर वाजू देणार नाही. कोणीही तसा प्रयत्न केल्यास गणपती मंडळ, डीजे मालक, चालक त्वरित कारवाई करणार आहे. शिवाय, डीजे वाहन जप्त करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यावेळी या भागातील अनेक गणपती मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

...तर खंडणीचे गुन्हे दाखल करू
गणपती उत्सव काळामध्ये कोणत्याही मंडळांनी जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये. जबरदस्तीने वर्गणी गोळा करत असताना कोणाकडूनही तक्रारी आल्यास खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या