रांजणगाव देवस्थान ट्रस्टला 'ऑनलाइन'चा विसर

रांजणगाव गणपती, ता. 10 नोव्हेंबर 2015 (तेजस फडके)- देशभरातील विविध देवस्थान ट्रस्ट मोठ्या प्रमाणात ऑनलाइनचा वापर करत आहेत. मात्र, येथील रांजणगाव देवस्थान ट्रस्टला ऑनलाइनचा विसर पडला असल्याचे पहायला मिळत आहे.

www.shirurtaluka.com या संकेतस्थळाच्या वतीने 5 ऑगस्ट 2012 रोजी महागणपती फेसबुक पेजचे (https://www.facebook.com/Ranjangaonganpati.mahaganpati) उद्घाटन करण्यात आले. अष्टविनायक गणपतींपैकी महागणपतीचे सर्वप्रथम फेसबुकपेज तयार करण्यात आले होते. या वृत्ताची दखल राज्यातील विविध दैनिकांनी घेतली होती. जगभरातून या पेजला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, फेसबुकच्या माध्यमातून भाविकांना महागणपतीचे दररोज दर्शन होत आहे.

मात्र, रांजणगाव देवस्थानच्या ट्रस्टच्या नवीन पदाधिकाऱयांची जुलै 2015 मध्ये निवड झाली. नवीन ट्रस्टींना ऑनलाइनबाबत माहिती देण्यात आली. परंतु, त्यांना ऑनलाइनचे महत्व अद्याप समजू शकलेले नाही. महागणपतीच्या महाद्वार दर्शनाच्या विविध दैनिकांना जाहिराती देण्यात आल्या. परंतु, यंदाच्या जाहिरांतीमध्ये ऑनलाइनचा एका ओळीचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. महागणपतीच्या परिसरामध्येही ट्रस्टींबद्दलची माहिती देण्यात आली आहे. परंतु, तेथेही ट्रस्टच्या संकेतस्थळचा अथवा फेसबुक पेजचा उल्लेख कोठेही दिसून येत नाही.

राज्यातील विविध देवस्थाने ऑनलाइनवर मोठ्या प्रमाणात काम करताना दिसून येतात. मात्र, येथील नवीन ट्रस्टला ऑनलाइन नकोसे झाल्याचे दिसून येत आहे. याबद्दल पत्रव्यवहारही करण्यात आला. परंतु, त्याला कचऱयाची टोपली दाखविण्यास ट्रस्ट विसरले नाही. नवीन देवस्थान ट्रस्टबद्दल विविध तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत.
(क्रमशः)

अध्यक्षांची अरेरावी...
रांजणगाव देवस्थानचे नवनिर्वाचीत अध्यक्ष नारायण पाचुंदकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अरेरावी करून तुम्हाला हवी तशी बातमी छापू शकता, असे उत्तर दिले.

देवस्थानची दिवाळीची जाहिरात पहा अन् अक्षरे ओळखा
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या