खंडाळयात जमिन फसवणूकीमुळे शेतकरयाची आत्महत्या

खंडाळे, ता. 11 नोव्हेंबर 2015 (पोपट पाचंगे)- जमीनीच्या व्यवहारात मोठी फसवणूक झाल्यामुळे येथील एका शेतकरयाला आत्महत्येला प्रवॄत्त केल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडिसी पोलिसांनी 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

नंदा गणेश गायकवाड (वय.34, रा.धामारी) यांनी रांजणगाव एमआयडिसी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गायकवाड यांचे वडिल दत्ताञेय किसन दरवडे (वय 70, रा.खंडाळे) यांनी जमिन विक्री व्यवहारात फसवणूक झाल्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. पुण्यातील एका खाजगी रूग्णालयात उपचार चालू असताना त्यांचा मॄत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ते 24 ऑक्टोबर 2015 या काळात खंडाळे गावाच्या हद्दीत आरोपी पांडुरंग दरवडे, अमर गायकवाड, हरिदास नळकांडे, सागर यादव, अशोक गायकवाड, गोरख पांढरकर, प्रदिप दरवडे, नवनाथ दरवडे, शंकर नरवडे, सुमतिलाल फुलफगर, संजय बोरकर, विजयालक्ष्मी सुरशे व चरणसिंह परहार यांनी संगनमताने दरवडे यांची जमिन गट क्रमांक 60 मधील 4 गुंठे जमिन खरेदी करण्याच्या नावाखाली त्यांच्याच मालकीच्या गट क्रमांक 78 मधील 1 हेक्टर जमिनीचे खरेदीखत करून फसवणूक व त्यावर खोटया सहया केल्याप्रकरणी दत्ताञय दरवडे यांनी आत्महत्या केली. त्यात उपचारादरम्यान त्यांचा मॄत्यु झाला.

दरम्यान, याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसून, सर्व आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या