उजणीत पाणी सोडण्याबाबत पुन्हा निर्णय घ्या- न्यायालय

मुंबई, ता. 4 डिसेंबर 2015- पुणे जिल्ह्यातील धरणांचे पाणी उजनीसाठी सोडण्याबाबत महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पुन्हा निर्णय घ्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 3) दिला. पुणे जिल्ह्यातील शेतकरी सुरेश पालांडे यांनी सादर केलेल्या याचिकेवर न्यायालयाने वरील आदेश दिला.
उजनी पाण्यावरून सोडल यांची पदावरून हकालपटटी्
रांजणगाव गणपती,
ता. 3 डिसेंबर 2015
(पोपट पाचंगे)- चासकमान या धरणाचे पाणी उजनी धरणाला सोडण्याचा निर्णय देणारया महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाचे सदस्य सु. वि. सोडल यांच्यावर बुधवारी (ता. 2) उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. सोडल यांना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती माजी आमदार अशोक पवार यांनी दिली.

या संदर्भात आमदार बाबूराव पाचर्णे, सुरेश गोरे, माजी आमदार पवार व रविंद्र कंधारे यांनी 5 नोव्हेंबरला उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने सोडल यांच्यावर ताशेरे ओढले.

पुणे जिल्हयातील चासकमान, भामा आसखेड व मुळशी धरणांमधून उजनी धरणात 10 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपत्ती नियमन प्राधीकरनाने 26 ऑक्टोबरला घेतला होता. दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच धरणांमध्ये कमी पाणीसाठा असताना व धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित असताना पाणी सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे खेड व शिरूर तालुक्यातील शेतकरयांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. आमदार गोरे, पाचर्णे व माजी आमदार पवार यांनी शेतकरयांच्या बाजूने जनहित याचिका दाखल केली. त्यावर मुंबर्इ येथे उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने प्राधीकरणाचे सदस्य सोडल यांना चांगलेच सुनावत, राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यावर सोडल यांनी मी प्रतिज्ञापञावर त्वरीत राजीनामा देतो, असे सांगितले. त्यावर यासंदर्भात न्यायालयात पुन्हा दुपारी सुनावणी होवून, सोडल यांनी मी ज्येष्ठ विधीज्ञ यांना सांगून राजीनामा देतो, असे न्यायालयात सांगितले.त्यावेळी न्यायालयाने सोडल यांना तुम्ही प्राधीकरणाच्या सदस्य पदावरून पायऊतार होता कि, आम्ही काढून टाकू असे सुनावत चांगलेच धारेवर धरले. उद्या आपल्या पदाच्या राजीनाम्याचे प्रतिज्ञापञ न्यायालयात सादर करण्यास सांगितले. तसेच तुम्ही उजनी धरणाच्या पाण्याचे लाभार्थी असल्याने प्राधीकरणाचे सदस्य म्हणून या पाण्याबाबतचा निर्णय कसा घेतला, असा सवालही सोडल यांना न्यायालयाने यावेळी विचारला असल्याचे पवार यांनी सांगितले.

यावेळी सोडल यांनी न्यायालयाचे म्हणणे मान्य करित आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. न्यायालयात याचिकाकर्तांच्या वतीने ऍड. ढाकेफाळकर, वालावलकर, सम्राट शिंदे, तेजस देशमुख यांनी तर प्राधीकरणाच्या वतीने ऍड. डी.डी. शिंदे यांनी कामकाज पाहिले.

दरम्यान, सोडल यांची उच्च न्यायालयाने सदस्य पदावरून हकालपटटी् केल्याने प्राधीकरणाचे अध्यक्ष रवी बुध्दिराजा व सदस्य चित्कला झुल्शी हे दोनच सदस्य प्राधीकरणात राहिले आहेत. याबाबतची पुढील सुनावणी गुरूवारी होणार असून, याबाबतच्या पुढील निर्णयाकडे व उजनीच्या पाण्याबाबत आता पुढे नेमके काय होणार, याकडे शिरूर, खेड व मुळशी तालुक्यातील शेतकरयांचे लक्ष लागले आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या