मांडवगणमध्ये पिंड व नंदीचे ढोलताशांच्या गजरात स्वागत

मांडवगण फराटा, ता. 4 डिसेंबर 2015- येथील ग्रामदैवत श्री वाघेश्वराच्या शिवलिंगाचे (पिंड) व नंदीच्या मूर्तीचे ग्रामस्थांतर्फे ढोलताशा, सनई, लेझीम व टाळमृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले. पाच वर्षांपूर्वी ग्रामस्थांतर्फे श्री वाघेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे.

ग्रामस्थांनी लोकवर्गणीमधून सुमारे तीन कोटी रुपयांचे मंदिर उभारण्यात येत आहे. मंदिराचे काम सध्या अंतीम टप्प्यात आहे. मंदिरात बसविण्यात येत असलेल्या शिवलिंग व नंदी राजस्थानमधून आणण्यात आले आहे. बाजारतळ मैदानापासून गावामधून मंदिरापर्यंत वाजच गाजत या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेचे लेझीम पथक, वडगाव रासाई येथील झांज पथक, गावातील भजनीमंडळ या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या सभेचे आयोजन केले होते. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या