बिबट्या मृतावस्थेत आढळला; जांबूतमध्ये महिला जखमी

पिंपळाचीवाडी, ता. 21 डिसेंबर 2015 (तेजस फडके)- येथील दत्तात्रय काळे यांच्या शेतात बिबट्याची मादी रविवारी (ता. २०) मृतावस्थेत आढळली. तिचे वय सुमारे साधारण २ वर्ष आहे.

विटभट्टीवर कामाला असणारा मजूर सकाळी शेतात जात होता. ऊसाच्या बांधावर बिबट्या दिसल्याने तो घाबरला. आरडा-ओरड केल्यानंतर आसपासची नागरिक गोळा झाले. त्यानंतर बिबट्या मृत असल्याचे लक्षात आले. येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र थोरात, अरुण होळकर, तुषार होळकर यांनी शिरुर येथील वनविभागाचे वनपाल दशरथ संगपाळ यांच्याशी संपर्क साधून या घटनेविषयी माहीती दिली. त्यानंतर वनपाल संगपाळ, वन कर्मचारी संपत पाचुंदकर, भाऊसो चव्हाण, गण्याबाप्पु काळे यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याची पाहणी केली. त्यावेळी बिबट्याच्या तोंडाला फेस आल्याचे निदर्शनास आले. बिबट्याचा म्रुत्यू विषारी साप चावल्यामुळे झाला असावा असा अंदाज वनपाल संगपाळ यांनी व्यक्त केला.

शिरुर येथे डॉक्टर उपलब्ध न झाल्याने मृत बिबट्याला शव विच्छेदनासाठी जुन्नर येथील बिबट्या निवारण केंद्रात पाठविण्यात आल्याचे वनपाल दशरथ संगपाळ यांनी www.shirurtaluka.comशी बोलताना सांगितले.

जांबूतमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी
जांबूत, ता. 21 डिसेंबर 2015 (सुभाष शेटे)- येथील कळमजाई वस्तीवर राहणाऱया लता वासूदेव जोरी यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. युवकांमुळे त्या बिबट्याच्या हल्ल्यातून बचावल्या आहेत. रविवारी सायंकाळी त्या चारा आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. यावेळी बिबट्याने पाठीमागून झेप घेऊन त्यांना पकडले. यामुळे मोठा आवाज झाला. घराशेजारी राहणाऱे राजेंद्र जोरी, पोपट कवडे, अक्षय जोरी, खंडू कवडे, रवींद्र कवडे व मयूर कवडे या युवकांनी बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. यामुळे बिबट्याच्या तावडीतून त्या बचावल्या. मात्र, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या