बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावा घेणार- किशोर गायकवाड

कोंढापुरी, ता. 24 डिसेंबर 2015 (तेजस फडके)- शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ते बेरोजगार तरुण नाईलाजाने गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसत आहे. या बेरोजगार तरुणांना एक नवी दिशा देऊन नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यासाठी लवकरच रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा युवक कॉँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ता किशोर गायकवाड यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना दिली.

सध्या अनेक ठिकाणी शिक्षणसंस्था उभ्या राहत असून, दरवर्षी हजारो विदयार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. परंतु, सर्वांनाच नोकरी मिळणे शक्य नसल्याने अनेक सुशिक्षित युवक आज बेरोजगार आहेत. त्यामुळे पैसे कमविण्यासाठी या युवकांची पाऊले आपोआपच गुन्हेगारीकडे वळतात. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या अनेक चोऱयांमध्ये सुशिक्षित युवकांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रांजणगाव गणपती किंवा शिरुर येथे सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

किशोर गायकवाड यांची सरचिटणीसपदी निवड
कोंढापुरी, ता. 18 नोव्हेंबर 2015 (तेजस फडके)- पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीसपदी येथील युवा नेते श्री. किशोर बाळासाहेब गायकवाड यांची निवड झाली आहे. राज्याचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या शिफारसिने नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिली. शिवाय, जिल्हा प्रवक्ते पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.

दरम्यान, गाव तेथे युवक काँग्रेस शाखा हा उपक्रम लवकरच सूरु करून मरगळ आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांना पुन्हा बळ देण्यासाठी विविध उपक्रम लवकरच राबविणार आहे, असे नियुक्ती नंतर बोलताना श्री. गायकवाड यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या