वृद्धपकाळात दोघांच्या वाट्याला आल्यात मरणयातना...

मांडवगण फराटा, ता. 30 डिसेंबर 2015 (तेजस फडके / संपत कारकूड)- दोन मुलांना लहानाचे मोठं केलं, कबाडकष्ट करुन प्रपंच उभा केला. एका मुलीचे शिक्षण करुन तिचं लग्न लावून दिलं. गेली चाळीस वर्षे रात्रंदिन कष्ट करुन झगडलेल्या आई-बाबांवर वृद्धपकाळात मात्र मरणयातणा वाटयाला आल्या आहेत. ही हकिगत सांगताना लिलावती सोपान डमरे (रा. वडगाव रासाई, चव्हाण वस्ती) या 60 वर्षाच्या वृध्देने पोलिस स्टेशनच्या पायरीवरच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

शोकांतिका एवढयावरच थांबली नाही. घरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडवगण फराटा पोलिस स्टेशनपर्यंत महिला पायी चालत आली. परंतु, पोलिस स्टेशनलाही कुलूप असल्यामुळे आपली कैफियत दाखल न करताच घरचा रस्ता धरावा लागला. www.shirurtaluka.comच्या प्रतिनिधींची सहज पोलिस स्टेशनकडे नजर गेली असता वरील वृध्दा येथे तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांची वाट पाहत बसल्याची दिसली. पोलिस स्टेशनला कुलूप होते. कोणीतरी येईल, आणि माझे गाऱहाणे ऐकील या आशाळभूत नजरेने वाट पाहत बसलेल्या महिलेची आस्थेने विचारपूस केली असता वरील विदारक चित्र समोर आले आहे.

कोण न्याय देणार?
गावी (बेनवाडी, ता. कर्जत जि. अहमदनगर) येथील चार एकर शेतजमीन लहानपणीच मुलांच्या नावे केली. मुलांना जगविण्यासाठी गाव सोडून वडगाव रासाई येथे गुऱहाळावर गुळव्याची कामे केली. जर्सी गाईचे शेण काढून दुध व्यवसायावर मुले मोठी केली. 40 वर्षे लोटल्यानंतर मुलांनी आई-वडिलांकडे पाठ फिरविली. त्यांच्या वडिलांना नुकताच पॅरोलचा झटका आला आहे. यामुळे त्यांना उभे राहणेही शक्य होत नाही. जगावे की मरावे, असा प्रसंग वृद्धांपुढे आहे. मुलांकडून या वृध्द दाम्पंत्याला देखभालीसाठी आर्थिक मदतीबरोबरच मायेचीही गरज आहे. परंतु, मोठी झालेल्या दोघाही मुलांना हे सामाजिक भान राहिलेले नाही. हीच कैफियत घेवून पोलिसांकडे दाद मागण्यासाठी आलेल्या महिलेस कोण न्याय देणार?
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या