सतीश केदारी यांची कार्यकारी संपादकपदी निवड

शिरूर, ता. 1 जानेवारी 2016- राज्यात शिरूर तालुक्याचे पहिले संकेतस्थळ ठरलेले www.shirurtaluka.comच्या कार्यकारी संपादकपदी सतीश केदारी यांची आज (शुक्रवार) निवड करण्यात आली आहे.

सतीश केदारी यांनी ऑनलाइन व दैनिकांच्या माध्यमातून तालुक्यातील विविध विषयांना वाचा फोडली आहे. गेल्या दोन वर्षांपासून www.shirurtaluka.comचे प्रतिनिधी म्हणून ते काम करत आहेत. ऑनलाइन क्षेत्राबरोबरच सोशल नेटवर्किंगमध्ये त्यांना विशेष आवड आहे. संकेतस्थळाची जबाबदारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून (ता. 1) त्यांनी हाती घेतली आहे. शिरूर तालुक्यातील ताज्या घडामोडींसह विशेष बातम्या संकेतस्थळाच्या माध्यमातून ते सतत अपलोड करणार आहेत.

दरम्यान, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते २६ मे २०११ रोजी विधान भवन येथे www.shirurtaluka.com या संकेतस्थळाचे उद्‌घाटन झाले आहे. शिरूर तालुक्यासह जगभरातील तब्बल 110 देशांमधील वाचक संकेतस्थळाला भेट देत आहेत. संकेतस्थळाने नुकताच 11 लाख वाचकांचा टप्पा पार केला आहे. शिरूर तालुक्यातील पत्रकार व वाचकांच्या प्रेमामुळेच संकेतस्थळाने मोठी आघाडी घेतली आहे. यापुढे संकेतस्थळावर विशेष बातम्यांसह सतत घडामोडींची माहिती देण्यात येणार आहे, असे केदारी यांनी निवडीनंतर सांगितले.

आपल्या भागातील विविध घडामोडी, प्रेसनोट, व्हिडिओ न्यूज व थेट बातम्यांसाठी संपर्क साधा-
सतीश केदारी- 8805045495
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या