व्यंकटेशकृपाला सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार

जातेगाव बु. ता. ६ जानेवारी २०१६ (सतीश केदारी) : येथील व्यंकटेशकृपा साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने देण्यात येणारा विलासराव देशमुख विशेष उद्योजकता पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष संदीप तौर यांनी दिली.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने नुकतेच या संदर्भात कारखान्याला पत्र पाठवून कळविले आहे. येत्या गुरुवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

व्यंकटेशकृपा कारखान्याने कमी कालावधीत महाराष्ट्रातील इतर कारखान्यांचे सर्व बचतींचे उच्चांक मोडले असून, हा कारखाना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कमीत कमी कामगारांमध्ये चालविला जातो. आतापर्यंत साखर कारखान्यांच्या उभारणीसाठी १00 ते १५0 एकर जमीन लागत असायची, मात्र व्यंकटेशकृपा हा साखर कारखाना अवघ्या १७ एकर क्षेत्रामध्ये उभारण्यात आलेला आहे. व्यंकटेशकृपा साखर कारखान्यात सर्वांत कमी वीज व वाफेचा वापर केला जातो. या कारखान्याच्या साखरेची गुणवत्ता अत्यंत उत्कृष्ट आहे.

या कारखान्याला देशातील व विदेशातील साखरधंद्यातील अनेक तज्ज्ञांनी भेटी दिल्या आहेत. या कारखान्याच्या प्रगतीसाठी तांत्रिक सल्लागार जे. टी. जाधव यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. तसेच व्यंकटेशकृपा कारखान्याने पर्यावरण सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याची माहिती तौर यांनी दिली आहे. हा कारखाना ऑटोमॅटिक फॅक्टरी म्हणून ओळखला जातो. या कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता २५00 मे. टन असतानादेखील कारखाना प्रतिदिन ३५00 मे. टनाने गाळप करीत आहे, हीदेखील निश्‍चितच उल्लेखनीय बाब आहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या