वाघाळ्याच्या आपली माती 'अ' संघाला विजेतेपदाचा मान

जिल्हा अजिंक्‍यपद निवड चाचणी खो-खो स्पर्धा
पुणे, ता. 21 जानेवारी 2016-
पुणे जिल्हा खो-खो संघटना आयोजित किशोर गटाच्या (चौदा वर्षांखालील) पुणे जिल्हा अजिंक्‍यपद निवड चाचणी खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात वाघाळे येथी आपली माती "अ'  संघाने विजेतेपद मिळविले.
 
शिवाजीनगर गावठाण येथील मैदानावर झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात शिवराम शिंगाडे आणि शुभम थोरातने केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर आपली माती "अ' संघाने (वाघाळे) माजंरवाडीच्या जगदंबा स्पोर्टस क्‍लबचा 11-4 असा एक डाव सात गुणांनी पराभव केला. या लढतीत आमची माती संघाच्या खेळाडूंचे वर्चस्व होते. मध्यंतरास त्यांनी 11-2 अशी नऊ गुणांची आघाडी मिळवली होती. या वेळी विजयी संघाकडून शुभम थोरात (नाबाद 2 मिनिटे 40 सेकंद, 5 मिनिटे व 1 गुण), शिवराम शिंगाडे (3 मिनिटे 10 सेकंद, 1 मी. व 2 गुण) यांनी सुरेख खेळ केला त्यांना चक्रधर काटकुडने (4 गुण) सुरेख साथ दिली. पराभूत संघाच्या अनुराग गायकवाड (1ः20 मिनिटे) व रोहन खंडागळेने (1ः20 मिनिटे) दिलेली लढत एकाकी ठरली.

उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत आपली माती "अ' संघाने अमर क्रीडा मंडळाचा 9-7 असा एक डाव दोन गुणांनी पराभव केला. मध्यंतरास आपली माती संघाकडे 9-2 अशी आघाडी होती त्यात महत्त्वाचा वाटा शुभम थोरात (4 व 1ः30 मिनिटे), अनिकेत चिखले (2 मिनिटे, 1ः20 मिनिटे व 1 गुण) व प्रज्योत जगदाळे (3 गुण) यांचा होता. पराभूत संघाकडून आदित्य गणपुले (1ः10 मिनिटे व 1 गुण) व साई मगर (1 मिनिटे व 1 गुण) यांनी दिलेली लढत एकाकी ठरली.

दुसऱ्या उपांत्य लढतीत मांजरवाडीच्या जगदंबा स्पोर्टस क्‍लबने आंबेगावच्या (मंचर) नरसिंह स्पोर्टस क्‍लबचा 19-16 असा तीन गुणांनी पराभव केला. मध्यंतरास जगदंबाकडे 8-7 अशी एक गुणाची निसटती आघाडी होती. या वेळी विजयी संघाकडून रोहन खंडागळे (1ः10 व 1ः50 मिनिटे आणि 5 गुण), सागर निकम (1ः30 मिनिटे व 3 गुण) व अनुराग गायकवाड (3 गुण) यांनी जोरदार खेळ केला. पराभूत संघाच्या श्रतिक भोर (1 व 2 मिनिटे आणि 6 गुण) आणि राहुल वाघने (1ः40 मिनिटे व 2 गुण) दिलेली लढत अपुरी पडली.

दरम्यान, वाघाळे येथील विद्यार्थ्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या