कंपन्यांमधील बोगसगिरी चव्हाट्यावर; गुन्हा दाखल

शिक्रापूर, ता. २५ जानेवारी २०१६ (विशेष प्रतिनीधी) : विविध कंपन्यांमध्ये बोगस सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या दोन एजन्सीवर या पुर्वी गुन्हे दाखल झाले असतानाच काल पुन्हा बोगस सुरक्षारक्षक एजन्सी व त्याच्या मालकावर शिक्रापुरात गुन्हा दाखल झाला आहे. उघड होत असलेल्या प्रकरणांमुळे ओोद्योगिक कंपन्यांमधील बोगसगिरी चव्हाट्यावर येत अाहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून खासगी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या एजन्सींनी घेतलेल्या परवान्यांची तपासणी सुरु केली असून मागील आठवड्यात दोन एजन्सीवर गुन्हे दाखल झाले आहेत.त्यानंतर अनेक ठिकाणी तपासणी करून कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.परंतु मध्येच ग्रूप दादांच्या कारवाईमुळे हि कारवाई थंडावली होती परंतु शिक्रापूर,कोरेगाव भिमा, सणसवाडी. वढू, पिंपळे जगताप, करंदी यांसह काही भागांमध्ये कोणतीही परवानगी न घेता सुरक्षारक्षक पुरविले जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांना मिळाली.त्यानंतर कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन तपासणी सुरु केली असता सणसवाडी येथील स्पेशल स्टूल्स प्रा.लि.युनिट २ या ठिकाणी जात तपासणी करत सुरक्षारक्षक एजन्सी बाबत एच आर प्रमुख मनोज पांडे व कामगार दत्तात्रय पाटील यांचेकडे चौकशी केली. या वेळी परवाना नसल्याचे आढळून आले. या एजन्सीचे पर्यवेक्षक अखिलेश तिवारी यांचेकडे चौकशी केली असता कुमार एंटरप्रायजेस सिक्युरिटी या नावाने एजन्सी असून त्याचा परवाना २०१४ सालीच संपला असून सदर परवाना फक्त पुणे शहराकरिता मर्यादित असल्याचे आढळून आले.तसेच या ठिकाणी कामावर असलेल्या सुरक्षारक्षक कामगारांची कसलीही वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी केली नसून सुरक्षारक्षकांना कसलेही प्रशिक्षण दिले नसल्याचे सुद्धा आढळून आले आहे. यावरून कुमार एंटरप्रायजेस सिक्युरिटी एजन्सीचे मालक संतोषकुमार अटलबिहारी त्रिपाठी व एजन्सी पर्यवेक्षक अखिलेश तिवारी यांचे विरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार अनिल जगताप यांनी फिर्याद दिली असून शिक्रापूर पोलिसांनी त्रिपाठी व तिवारी यांचेवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले अाहे.

पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत असून सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या सर्व ठिकाणी तपासणी करण्यात येणार असून कोठे हि बेकायदा सुरक्षारक्षक नेमण्यात आले असल्याची माहिती मिळाल्यास अनिल जगताप यांचेशी ९८५०५८६३३७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी केले आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या