कवठे येमाईची ग्राससभा वादळी....

कवठे यमाई, ता.२७ जानेवारी २०१६ (सुभाष शेटे) प्रजासत्ताक दिनी शिरुर तालुक्यात विविध गावांमध्ये ग्रामसभांचे अायोजन  करण्यात अाले होते.अनेक ठिकाणी शांततेत ग्रामसभा झाल्या तर  कवठे येमाई येथे पाणी पुरवठा योजने वरून ग्रामसभेत चांगलाच गोंधळ झाला.

प्रजासत्ताक दिनाचे अौचित्य साधुन  तालुक्‍यातील अनेक   गावांमध्ये  विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम  साजरे करण्यात आले. त्यानंतर अनेक गावांत ग्रामसभा  पार पडल्या. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनी विशेष ग्रामसभा होत असल्याने यावेळी अनेक नागरिकांना  मोठ्या प्रमाणावर उत्सुकता होती. तालुक्याच्या पश्चिम भागातील  मलठण येथे ग्रामसभा शांततेत पार पडली.येथे ग्रामपंचायती अंतर्गत गेल्या वर्षभरात झालेल्या विविध विकास कामांबाबत उपस्थित ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. सरपंच राणी वाव्हळ व त्यांच्या सर्व सहका-यांनी सर्वांना बरोबर घेत एकत्रित विचाराने गेल्या वर्षभरात मलठण गावात सुरू केलेल्या व पूर्णत्वास आणलेल्या विविध विकास कामांबाबत ग्रामस्थांनी सर्वांचे कौतुक केले.या वेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

कवठे येमाई येथील ग्रामसभेत पाण्याचा मुद्दा चांगलाच गाजला.गावात प्रस्तावित सुमारे दीड कोट रुपयांची असलेली ही पाणी पुरवठा योजना होणार का ? असा प्रश्‍न मात्र सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.या प्रस्तावित योजनेची विहीर खोदायची कुठे?,गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी की (आणखी काही कुणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी?) यावरून उपस्थित ग्रामपंचायतीच्या आजी माजी पदाधिका-यांमध्ये चांगलेच वादंग झाले.सुमारे चार तास चाललेल्या या ग्रामसभेत उपस्थित सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्‍नांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचा तसेच गावचे सरपंच सुदाम इचके व ग्रामपंचायत प्रशासन चांगले कार्य करीत असताना ही केवळ चांगल्या कामांना विरोधाला विरोध हे विकासाच्या दूरदृष्टीचे द्योतक नसल्याचा आरोप कवठे येमाई गावच्या ग्रामपंचायत सदस्या दीपाली गायकवाड,मंगल गावडे व आशा शितोळे यांनी केला आहे.तर गावच्या पाणी पुरवठा योजनेचा आराखडा समजून घेण्याची गरज ही काहींनी व्यक्त केली आहे.
शिरसगाव  काटा येथे उपसरपंच विजेंद्र गद्रे यांच्या उपस्थितीत ग्रामसभा शांततेत पार पडली.

शिरुर तालुक्यात झालेल्या ग्रामसभांना अनेक ठिकाणी महिलांची उपस्थिती मात्र अल्प होती.तर दारुबंदीचा मात्र अनेकांना विसर पडलेला दिसत होता.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या