डोंगरगणला वंचित महिलांसाठी विविध उपक्रम

डोंगरगण, ता.२९ जानेवारी २०१६ : येथे  ग्रामपंचायत सदस्या राणीताइ चोरे यांच्यावतीने वंचित महिलांसाठि विविध उपक्रम राबविण्यात अाले. यावेळी वाण म्हणुन उपस्थित महिलांना शंभर सुपल्या व डस्टबीन भेट देण्यात अाल्या.

समाजातीलगरीब,कष्टकरीव वंचितमहिलांच्या जिवनात काही क्षण अानंदाचे यावेत याउद्दात हेतुने डोंगरगण येथे सामाजिक कार्यकर्त्या व ग्रामपंचायत सदस्या राणीताइ चोरे यांच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात अाले.

प्रारंभी हळदी-कुंकवाचे अायोजन करण्यात अाले.या कार्यक्रमात वंचित महिलांना विशेष स्थान देण्यात अाले. या वेळी उपस्थित महिलांना स्वच्छतेचे महत्व पटवुन देत स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वखर्चाने शंभर सुपल्या व डस्टबीन चे  'वाण' म्हणुन वाटप करण्यात अाले.त्यानंतर संगीत खुर्ची,फुगे फोडणे तसेच इतर स्पर्धात्मक खेळांचे अायोजन  करण्यात अाले होते.या वेळी महिलांनी हि उत्स्फुर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची रंगत वाढवली.

या कार्यक्रम समारोप प्रसंगी स्त्री जन्माचे स्वागत म्हनुन मुलीसाठी मानधन देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या अनोख्या कार्यक्रमाच्या अायोजनाबद्दल अनेक महिलांनी या वेळी समाधान व्यक्त केले. यावेळी ग्रा.पं.सदस्या राणीताइ चोरे, शैला सदाफुले, नंदा चोरे, संगिता पवार, शुभांगी पवार, पंखा शेंडगे, उषा चाटे, सुरेखा चोरे अादींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमास सर्वच वयोगटातील महिलांची  मोठ्या प्रमाणावर लक्षणीय उपस्थिती होती.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या