एस.टी. कामगार संघटनेची युवक कॉंग्रेसच्या वतीने स्थापना

शिरूर, ता.१ फेब्रुवारी २०१६ : येथे नुकतीच अामदार जयप्रकाश छाजेड यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स (इंटक) या कामगारांच्या संघटनेची युवक कॉंग्रेस च्या वतीने शिरुर अागारात  स्थापना करण्यात अाली.

दोन महिन्यांपु्र्वी एस.टी कामगारांनी राज्यवापी संप पुकारला होता. यावेळी शिरुर युवक कॉंग्रेस च्या येथील कामगारांच्या समस्या व मोठ्या प्रमाणावर असलेल्या अडचणी निदर्शनास अाल्या होत्या. या कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी शिरुर युवक कॉंग्रेस ने पुढाकार घेत महाराष्ट्र एस.टी.कामगारांची (इंटक) च्या शाखेच्या उद्घाटन सोहळा अामदार जयप्रकाश छाजेड यांच्या उपस्थितीत शिरुर अागारात नुकताच संपन्न झाला.

यावेळी कामगारांनी २५%पगारवाढ व्हावी, अॅलोकेशन पदधतीने कामगारांना ड्युटी मिळावी,७वा वेतन अायोग स्थापन व्हावा अादी प्रमुख मागण्या मांडल्या.

या कार्यक्रमास युवककॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष विजेंद्र गद्रे, महेंद्र मल्लाव, शहराध्यक्ष महेश जगदाळे, अमजद पठाण, हुशेन शाह, प्रदिप माने, अमोल पवार अादी मान्यवर तसेच एस.टी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या