तांदळी खून प्रकरणातील तरुणाची दुचाकी हस्तगत

तांदळी, ता. १ फेब्रुवारी २०१६ (विशेष प्रतिनीधी) : येथील खून प्रकरणातील तरुणाची दुचाकी  हस्तगत करण्यात अाज (सोमवार) पोलीसांना यश अाले.

तांदळी येथील  बेपत्ता तरुण सतीश सुभाष गदादे याचा छेड काढल्याच्या कारणावरुन ता. २६ रोजी विळ्याच्या सहाय्याने वार करुन व  मफलर ने गळा अावळून खून करण्यात अाला होता. सदर खुनानंतर अारोपी नितीन भाउसाहेब साबळे (रा. रामवाडी, निघोज, ता. पारनेर) व अमोल भाउसाहेब गदादे (रा. तांदळी) यांनी मृतदेह  वाळकी (ता.दौंड) येथील मुळा-मुठा संगम नदीत टाकला होता. तसेच दुचाकी क्र. MH-12 LN 6602 ही कानगाव-मांडवगण बंधा-यात टाकली होती.

पोलिसांनी अारोपी गदादे याला गाडी टाकल्याचे ठिकाण दर्शविण्यासाठी या ठिकाणी अाणले होते. परंतु, गाडी टाकल्याचे नेमके ठिकाण सांगता न अाल्याने पोलिस निरिक्षक भगवान निंबाळकर यांनी मासेमारी करणा-या मच्छिमार बांधवांना तेलाचा तवंग असणा-या असणा-या ठिकाणी शोध घेण्यास सांगितले. सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर गाडी शोधण्यास यश अाले.

या खुन प्रकरणाचा कसोशीने छडा सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे व त्यांच्या सहका-यांनी छडा लावला अाहे. अाजच्या शोध मोहिमेत शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण रासकर, अबासाहेब जगदाळे, भुषण कदम, किरण डुडुके अादींनी सहभाग घेतला होता.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या