घोड व चासकमान कालव्याला पाणी येणार कधी ?

शिरूर, ता.५ फेब्रुवारी २०१६ : तालुक्याच्या  पु्र्व व पश्चिम पट्टयातील जिरायती भागामध्ये उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. परिसरातील तलाव ही कोरडे पडले असून घोड व चासकमान कालव्याला पाणी येणार कधी? असा सवाल शेतक-यांकडून केला जातोय.

घोड व चासकमान कालव्यावर शिरुर तालुक्यातील बहुतांश शेती अवलंबून अाहे. शिरुरच्या पश्चिम पट्टयासह पुर्व भागातील मोटेवाडी, अालेगाव पागा, कोळगाव डोळस, शिरसगाव काटा अादी भागातील तलावांमधील पाणी पातळी घटली आहे. घोड धरणाखालील नलगेमळा, पिंपळसुटी, तांदळी अादी बंधारे कोरडे ठणठणीत पडलेले पहावयास मिळतात. पाणी पातळी घटल्याने या भागात पाण्याची भीषण स्थिती निर्माण झाल्याने पाणी मिळवण्यासाठी अनेक शेतकर्‍यांकडून बोअरवेलला वाढती मागणी असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.

यावर उपाय म्हणून अनेक शेतकरी हे आपल्या घराजवळ अथवा शेतामध्ये नवीन बोअरवेल घेऊन पाण्याची सोय करण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, जमिनीतील पाणीपातळी खोलवर गेल्याने पाणी लागेल की नाही, याची शाश्‍वती नसतानाही शेतकरी आर्थिक तोटा सहन करून आपले नशीब अजमावत आहेत. एकूणच या भागात पाण्यासाठी बोअरवेलला वाढती मागणी आहे.

तालुक्यातील शेती घोड व चासकमान कालव्यावर अवलंबून असल्याने शेतीसाठी नको पण पिण्यासाठी तरी पाणी सोडा, अशी मागणी शेतक-यांनी केली अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या