हिवरे सोसायटीची निवडणूक बिनविरोध

हिवरे, ता.६ फेब्रुवारी २०१६ (प्रतिनीधी) : येथील सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असुन तर निवडनुकीनंतर चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची निवड देखील बिनविरोध करण्यात यश आले आहे.

हिवरे येथील सोसायटी साठी सदस्य संख्या १३ असून गावामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीचा उमेदवार उपलब्ध नसल्याने ती एक जागा रिक्त ठेवण्यात आली असून उर्वरित जागेवर महिला सर्वसाधारण रुख्मिणी जगताप, सोनुबाई रणपिसे. ओ. बि. सि संतोष गायकवाड. अनुसूचित जाती एकनाथ झेंडे तर सर्वसाधारण पुरुष या जागेतून सरपंच अमोल जगताप यांनी अर्ज दाखल केला होता परंतु निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अमोल जगताप यांनी स्वतःचा अर्ज मागे घेऊन राहुल टाकळकर, जालिंदर मांदळे, सुनील जगताप, परशुराम जगताप, काळूराम देशमुख, सुनील तांबे, प्रविण टाकळकर, रायचंद मांदळे यांची  जगताप यांच्या प्रयत्नाने बिनविरोध निवड करण्यात आली अाहे. तर या निवडीनंतर चेअरमन पदी संतोष गायकवाड तर व्हाईस चेअरमन पदी सोनुबाई बबन रणपिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीनंतर हिवरे ग्रामस्थांच्या वतीने सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या