प्रदिप बेंद्रे 'शिरुर केसरी'तर सुयश गोरे उपविजेता

निर्वी,ता.८ फेब्रुवारी २०१६(सतीश केदारी):येथे भरविण्यात अालेल्या कुस्ती स्पर्धेत  अंतिम लढतीत अांबळे येथील प्रदिप दत्तात्रय बेंद्रे हा' शिरुर केसरी' चा मानकरी ठरला तर चिंचणी येथील सुयश तुळशीराम गोरे उपविजेता ठरला.

निर्वी येथे शिरुर तालुका मल्लसम्राट स्पर्धा गेल्या दोन दिवसांपासुन कु्स्ती स्पर्धा सुरु होती.शनिवारी स्पर्धेला सुरुवात झाली होती. या दोन दिवसांत तालुक्यासह जिल्हाभरातील नामवंत मल्लांनी  या स्पर्धेत सहभाग नोंदविला.काल (रविवारी,ता.८)अंतिम लढतींचे अायोजन केले होते.या अटीतटीच्या झालेल्या लढतीत अांबळे येथील प्रदिप बेंद्रे ने चांदीची गदा पटकावत या वर्षीचा शिरुर केसरी चा मान मिळविला.तर
अंतिम कुस्तीवेळी प्रेक्षकांनी केलेल्या गोंधळाने अनेक मान्यवरांना शेवटची लढतच पाहता अाली नाही.

ड्रोन कॅमेरा चा वापर : लढती मध्यंतरात रंगातअालेल्या असताना हवेत उडत असलेल्या तबकडी ने अनेकांचे लक्ष विचलित केले.पहिल्यांदाच ग्रामीण भागात पाहत असलेल्या या ड्रोन कॅमेरा पाहण्याची उत्सुकता होती.व फोटो काढायचा मोह अनेकांना अावरता अाला नाही.
कुस्ती कि राजकिय अाखाडा : शिरुर तालुका कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी नामवंत मल्लांसह शिरुर -हवेलीतील सर्वच पक्षांच्याराजकिय पुढा-यांनी हजेरी लावली.या मध्ये जि.प. अध्यक्ष प्रदिप कंद,माजी अामदार अशोक पवार, विद्यमान अामदार बाबुराव पाचर्णे, मनसेचे संदिप भोंडवे,बांधकाम सभापती मंगलदास बांदल,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शेलार,अादी सर्वांचीच उपस्थिती लक्ष वेधुन घेत होती.
देवाचंच खायचं न देवाला ओवाळायचं :पैलवान मंगलदास बांदल यांनी भाषण सुरु करताच अनेकांवर स्तुतीसुमने उधळली.या वेळी शेजारीच उभ्या असणा-या एका पदाधिका-याचे नाव घेत,'मी तुमचे अाभार माननार नाही कारण ज्यांच्या जिवावर मोठे झालो.त्यांनाच थोडं दिलं तर बिघडलं कुठं अर्थात देवाचंच खायचं न देवालाचं ओवाळायचं, तुमच्याबरोबर अाम्हीही यात सामील होतोच की " असे म्हणताच उपस्थितांत एकच हशा पिकला.

अागामी निवडणुकीची नांदी
: येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीसाठी अनेकांची चाललेली घालमेल अगदी व्यासपीठावरुन स्पष्ट निदर्शनास येत होती.त्याच अनुषंगाने हे  शक्तिप्रदर्शन तर नाही ना असा सवाल मनात येत होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने अनेकांना बसण्यास जागा नसल्याने त्रास होत होता. 
कु्स्ती स्पर्धेचा निकाल पुढिलप्रमाणे :
 वजन गट(२८ किलो)
प्रथम : किशोर नारायण पिंगळे(भांबर्डे)
द्वितीय: अाकाश बाळासाहेब शेंडकर(केंदुर)
वजन गट (३२ किलो)
प्रथम :अादित्य सुनील जाधव(न्हावरा)
द्वितीय: अोंकार निंबाळकर(न्हावरा)
वजनगट(३८ किलो)
प्रथम :विशाल जाधव(कोरेगाव भिमा)
द्वितीय: अविनाश चौगुले (मांडवगण फराटा)
वजनगट (४५ किलो)
प्रथम :अमोल पिंगळे (भांबर्डे)
द्वितीय :अर्जुन गव्हाणे(न्हावरा)
वजनगट (५२ किलो)
दिपक चौगुले
गणेश जाधव
वजनगट (६० किलो)
कुलदिप इंगळे
अाबा शेंडगे
वजनगट(६६ किलो)
अमोल धुमाळ
दिपक कोळपे
वजनगट (७४ किलो)
किरण पवार
अाकाश पवार
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या