महागणपती मंदिरात माघ महोत्सवानिमित्त कार्यक्रम

रांजणगाव गणपती, ता.१० फेब्रुवारी २०१६: येथील महागणपती मंदिरात माघ महोत्सव साजरा करण्यात येत आहे, अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात अाली.

रांजणगाव देवस्थानच्यावतीने माघ गणेश जयंतीनिमित्त द्वारयात्रा, भजन, किर्तन, महापुजा अादी विविध धार्मिक कार्यक्रमाचे अायोजन करण्यात अाले अाहे. मंगळवारी सकाळी पालखीचे करडे गावाकडे प्रस्थान झाले. त्यानंतर परिसरातील विविध भजनी मंडळांनी भजनाचे कार्यक्रम साजरे केले. बुधवारी पालखी द्वारयात्रेसाठीनिमगाव म्हाळुंगी व गणेगाव खालसा गावाकडे प्रस्थान करणार अाहे. गणेश  जयंतीच्या दिवशी पालखी द्वारयात्रेसाठी ढोकसांगवी गावाकडे प्रस्थान करणार अाहे.

गुरुवारी माघ गणेश जयंतीनिमित्त गणेशजन्माच्या किर्तन सोहळ्याचे अायोजन करण्यात अाले अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या