...अन पोलिसामुळे नागरिकांची चांगलीच झाली करमणूक

शिरसगाव काटा, ता.१२ फेब्रुवारी  २०१६ (विशेष प्रतिनिधी): येथे एका पोलिस कर्मचा-याच्या भूमिके मुळे आज रस्त्याने जाणाऱ्या  नागरिकांची चांगलीच करमणूक झाली.

सविस्तर माहिती अशी की, शिरसगाव काटा नजीक जगतापवाडी येथे वाळू उपसा करणारा जेसीबी एका पोलिस  कर्मचा-याने अाज सकाळी ताब्यात घेतला होता. बराचवेळ रस्त्यावरच जेसीबीसह बोलणी सुरू होती. दरम्यान रस्त्यावरून येणारे-जाणारे नागरिक हा प्रकार पाहत होते. ही गोष्ट कळताच आमच्या प्रतिनिधीने त्या ठिकाणी धाव घेतली असता रस्त्यावरच हा प्रकार चालला होता. पत्रकार  त्या ठिकाणी आल्याचे कळताच जेसीबी सोडून देण्यात आला. व संबंधित पत्रकारालाचं त्या पोलीस कर्मचा-याने तुम्ही कोण? कोणत्या पेपर ला काम करता? असे सवाल विचारून त्रास देण्यास  सुरुवात केली.

बराच वेळ रस्त्यावरचं हा प्रकार चालला असल्याने जाणाऱ्या येणाऱ्यांची चांगलीच करमणूक झाली तर सकाळी सकाळीच जेसीबी सोडून दिल्याची वाळू व्यवसायिकांमध्ये व परिसरातील नागरिकांमध्ये  जोरदार चर्चा रंगू लागली.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या