... तर सत्ताधाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा?

शिक्रापूर, ता.१५ फेब्रुवारी २०१६ (प्रतिनीधी) : शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव व शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याची संधी जो पर्यंत मिळत नाही, तो पर्यंत माझा या सत्ताधाऱ्यांवर विश्वास नाही आणि यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांनी केला आहे.

शिक्रापूर येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने एका खासगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना शरद पवार हे बोलत होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले, 'सध्याचे अनेक सत्ताधारी हे जाहीरपणे माझा सल्ला घेत असल्याचे सांगतात. परंतु, नंतर हळूच कानात सांगतात कि तुम्ही उत्पादकांचा विचार करता आणि आम्ही खाणारांचा विचार करतो. यावर्षी कांदा उत्पादन २० टक्के वाढल्याने कांदा भाव अजूनही कमी होण्याची भीती आहे. मला कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाटत आहे.'

दिलीप वळसे पाटील म्हणाले, 'पवार साहेबांच्या कार्यांमुळे शिरूर तालुका हा पुणे जिल्ह्यात सिंचनात एक नंबरला आला आहे. या ठिकाणी कारखानदारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, सध्याचे सरकार हे उद्योगपतींसाठी काम करत असून निर्यात देखील कमी झालेली आहे. दोन वर्षापूर्वी फक्त शेतीमाल निर्यातीतून देशाला २ लाख १७ हजार कोटीचे परदेशी चलन मिळाले. परंतु, तेच चलन आता चालू वर्षी ७३ लाखांनी कमी झाले असल्याने शेतकऱ्यांना खरोखरच अच्छे दिन आलेत का? अशी शंका अाता वाटू लागली आहे.'

यावेळी माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. या प्रसंगी प्रदीप वळसे पाटील यांसह शिरूर व आंबेगाव तालुक्यातील अनेक मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या