होयरबिगेर कंपनी व कामगार संघटनेत वेतवाढ करार

कोंढापुरी, ता. 16 फेब्रुवारी 2016- येथील होयरबिगेर इंडिया प्रा. लिमिटेड कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यामध्ये नुकताच कामगारांच्या तृतीय वेतनवाढीचा करार 14 महिन्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर संप्पन झाला. हा करार तीन वर्षांसाठी (2015 ते 2018) असून, हा करार एका ग्रेड मध्ये झाला आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.

वेतनवाढीच्या करारामुळे कर्मचाऱयांच्या वेतनात 17 हजार रुपयांनी वाढ होणार आहे. शिवाय, सीटीसी पगावरवाढ 18 हजार 100 एवढी करण्यात आली आहे. याशिवाय कर्मचाऱयांना विविध सवलती मिळणार आहेत.

या करारासाठी अनेकांचे सहकार्य लाभले आहे. यामध्ये कायदेशिर सल्लागार, वकिल, हिंद मजदूर सभा, श्रमिक एकता महासंघ, वर्लपुल कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास खेडकर, टाटा बँटरी कामगार संघटनेचे अध्यक्ष गणेश खेडकर, व्हिल्स इंडिया यूनियनचे माजी सचिव गोरक्ष शिंदे, ट्रॅन्टर इंडिया यूनियनचे अध्यक्ष राजू दरेकर, राजेंद्र बेंद्रे, सुल्झर इंडीया यूनियनचे अध्यक्ष संतोष भुजबळ, बुरखार्ड कॉम्प्रेसिंग संघटनेचे सचिव  शिंदे मामा, किर्लोसकर ब्रदर्स संघटनेचे अध्यक्ष सी. पी. गायकवाड, कंपनीचे कामगार संघटनेचे अध्यक्ष महेशदादा भगत, सचिव संदीप डोमाळे, सचिन पंदरकर, प्रविण धुमाळ, दादा थिटे, श्री. टोपले, श्री. जावळे, श्री. चेडे व भाऊसाहेब धुमाळ आदींचा समावेश आहे.

कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्निलभैया गायकवाड, उद्योजक विनयशेठ गायकवाड व इतर अनेक सहकार्यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले आहे. कंपनी कामगार संघटनेतील कामगरांनी यूनियनवर जो विश्वास, धैर्य, संयम आणि एकता दाखवल्यामुळे व्यवस्थापनाशी चर्चा यशस्वी झाली आहे, असेही अधिकाऱयांनी सांगितले.

कंपनीचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे-

अध्यक्ष - संतोषशेठ खेडकर
 सेक्रेटरी - अतुलभैया धुमाळ
उपाध्यक्ष -  अनिल जाधव
सचिव-  दीपक शिवले
खजिनदार- तुकाराम गोरडे
सदस्य- उमेश दरवडे, मिनानाथ दुर्गे
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या