घोड कालव्याला पाणी न सोडल्यास अांदोलन करु...

शिरसगाव काटा ता.१८ फेब्रुवारी २०१६ (प्रतिनीधी): घोड कालव्याला व नदी ला अाठ दिवसांत पाणी न सोडल्यास मोठे अांदोलन करण्यात  येइल असा इशारा शेतकरी संघटना व  परिसरातील तीन गावांनी दिला अाहे.

घोडधरणाखाली शिरसगाव काटा,पिंपळसुटी इनामगाव ही तीनगावे येत असुन हजारो हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येते.सध्या शिरसगाव ला पाण्याची मोठी टंचाइ जानवत असुन पाण्याअभावी येत्या काही  दिवसांत टॅंकरसुरु करावा लागणार अाहे. त्याचप्रमाणे पिंपळसुटी येथील धनगरवाडी बंधारा, इनामगाव येथील गांधलेमळा बंधारे कोरडे पडले आहेत. घाडगेमळा, दर्यापट, शिवनगर, भैरवनाथवाडी, वाळुंजवस्ती, गाजरेवस्ती या परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत असुन जनावरे जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत अाहे.

परिसरात पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर बनला असुन अाठ दिवसांत घोड धरणातुन नदीत व बंधा-यात पाणी न सोडल्यास मोठे अांदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे शरद गद्रे, इनामगावचे कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाडगे यांनी दिला अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या