अप्पर जिल्हाधिका-यांच्या अादेशाला वाटाण्याच्या अक्षता?

आमदाबाद ता.१८ फेब्रुवारी २०१६(तेजस फडके/सतीश केदारी):येथील सुवर्णा रविंद्र पवार यांच्या  पर्डी जमिनीबाबत अप्पर जिल्हाधिका-यांनी नोंदीसंबंधी रितसर अादेश देउनही महसुल कर्मचा-यांनी मात्र अादेशालाच केराची टोपली दाखविण्याचा गंभीर प्रकार घडला अाहे.

सविस्तर माहिती अशी कि,श्रीमती सुवर्णा रविंद्र पवार यांची अामदाबाद येथे पर्डी जमीन२/१अ(क्षेत्र २ हेक्टर),पर्डी जमीन २/२ ब(० हे.५९ अार),पर्डी जमीन २/३क(क्षेत्र २ हे.)अशी जमीन अाहे.काही काळापुर्वी तहसिलदारांच्या हुकुमाने फेरफार नोंद नं १६७१ ची पवार यांच्या नावे असणारी जमीन यांना कुठलीही पुर्वसुचना न देता कमी करण्यात अाली होती. हे पवार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी या निर्णयाविरोधात मावळ चे उपविभागीय अधिकारी व तदनंतर अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे अपिल केले होते.श्रीमती पवार यांनी दाखल केलेलेअारटिएस/२/अपिल/२०१२ हेअपिल अप्पर जिल्हाधिका-यांनी ता.०१//१०/२०१५ रोजी मान्य करुन फेरफार नोंद नं १६७१ हा पुनर्जिवीत करण्यात यावे असा अादेश दिला होता.यानंतर  मुळ अादेशाची प्रत पवार यांनी तहसिलदारांना ता.२१/११/२०१५ रोजी समक्ष देण्यात अाली त्यावेळेस अारटीएस/अपील ६१५/२०१२ हे अारटीएस/अपील६२५/२०१२ असे दुरुस्त करण्यात यावे असे पवार यांना तोंडी सांगण्यात अाले.त्यानुसार अादेश दुरुस्त करुन १८/०१/२०१६ रोजी पुन्हा शिरुर चे तहसिलदार यांना समक्ष भेटुन देण्यात अाला.

दरम्यान महसुल च्या संबंधित अधिका-यांनी, जावक क्र.१८/१/२०१६ रोजी ११६/१६ या क्रमांकाने नोंद करण्यासाठी पाठविला अाहे असे सांगितले यावेळी पुन्हा ३०/०१/२०१६ रोजी पवार यांनी संबंधित अधिका-यांकडे पाठपुरावा केला असता अामच्याकडे असा कोणताच अादेश अाला नसल्याचे सांगितले. दरम्यान पवार यांनी पुन्हा अप्पर जिल्हाधिका-यांचा दुरुस्ती अादेश घेउन तहसिलदार कार्यालयात जमा करुन अामदाबाद चे तलाठी यांच्याकडे जमा केली अाहे.

जुन्या एेतिहासिक काळापासुन पवार यांच्या नावावर असलेली पर्डी जमीन कोणतीच पुर्वकल्पना न देता अचानक कमी करण्यात अाली.याची माहिती मिळाल्यानंतर पवार कुटुंबाने न्यायासाठी धाव घेतली अाहे.न्यायालयाने देखील ती मान्य केली.परंतु महसुल च्या मग्रुर अधिका-यांनी मात्र वारंवार विविध कारणे देउन अप्पर जिल्हाधिका-यांच्या अादेशालाही रितसर केराची टोपलीच दाखविली अाहे.महसुल कर्मचा-यांनी पवार कुटुंबाचा सहा वर्षांपासुन अाजतागायत एकप्रकारे छळच चालवला असुन या छळापायी सुवर्णा पवार यांच्या पतीचे  हदयविकाराच्या धकक्याने निधन झाले असुन या कुटुंबाची अद्याप पिळवणुक सुरुच अाहे.

या दरम्यान सुवर्णा पवार यांच्यावरदेखील उपचार सुरु असुन तब्ब्येत खालावलेली अाहे तसेच या काळात कोणताही धोका उद्भवल्यास या प्रकरणातील  महसुलच्या अधिका-यांना जबाबदार धरण्यात यावे असे त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले अाहे.

या गंभीर प्रकाराबाबत शिरुर चे तहसिलदार राजेंद्र पोळ यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता संपर्क होउ शकला नाही.
  
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या