'अर्चना'ला शिक्षणासाठी हवाय तुमच्या मदतीचा हात!

कवठे यमाई, ता. १९ फेब्रुवारी २०१६ (सुभाष शेटे): शिक्षणाची ओढ असून ही केवळ व्यसनी आई-वडिलांच्या दुर्लक्षामुळे आजीला सांभाळ करावा लागत असलेल्या येथील हिलाळमळ्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत असलेल्या असलेल्या आदिवासी ठाकर समाजातील अर्चना संजय जाधव या चिमुरडीला एका डोळ्यास अंधत्व अाले असुन दु-या डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे.

सध्या आजी उमाबाईसह ती एका कोपीत राहतेय. गेल्या 3-4 दिवसांपासून या आजी-नातीवर उत्पन्नाचे साधनच नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे .समाजातील दानशूर व्यक्तींकडून अर्चनास शिक्षणासाठी व जगण्यासाठी मदतीचा हात मिळावा ही अपेक्षा हिळाळमळा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

जिल्हा परिषदेच्या हिळाळमळा (कवठे येमाई) प्राथमिक शाळेत २ रीत शिकणा-या आदिवासी ठाकर समाजातील अर्चनाच्या एका डोळ्यास अंधत्व अाले अाहे तर दुसरा डोळा ही निकामी होण्याच्या मार्गावर असल्याचे लक्षात येताच शाळेच्या मुख्याध्यापिका माया आव्हाड व योगिता चाटे यांनी त्वरेने हालचाल करीत शिरूरच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन शिंदे यांच्या सहकार्यातून अर्चनाच्या डोळ्यावर तातडीने उपचार करण्याकामी तिला मंचरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. निकामी होण्याच्या मार्गावर असणा-या दुस-या डोळ्यावर नुकतीच तातडीने व यशस्वी शस्रक्रिया झाल्याने आता अर्चनाला ब-यापैकी दृष्टी लाभली आहे.

शाळेपासून ३ ते ४ कि.मी.अंतरावर ठाकर वस्तीत आपली मोलमजुरी करुण दोघींची गुजराण व अर्चनाची शाळा पाहणारी आजी उमाबाई यांना अर्चनाकडे लक्ष द्यावे लागत असल्याने व काम करता येत नसल्याने त्यांच्यावर काही दिवसांपासून उपासमारीची वेळ आली आहे. या दोघींना तातडीची मदत म्हणून मुख्याध्यापिका माया आव्हाड यांनी 500 रुपये व किराणा साहित्य घेऊन दिले आहे. दुस्-या शिक्षिका योगिता चाटे व बाळासाहेब हिलाळ यांनी ही प्रत्येकी 500 रुपयांची मदत करीत या आदिवासी ठाकर समाजातील गरीब, हुशार व शिकण्याची उमेद असणा-या चिमुरड्या अर्चनाला मदतीचा हात दिला आहे.

अठराविश्‍व दारिद्रयात जिवन व्यथित करीत जगण्यासाठी लढा देत असलेल्या या आजी-नातीच्या जोडीला गरज आहे ती समाजातील उदार व दानशूर व्यक्तींकडून मदतीचा हात मिळण्याची!

ज्यांना अर्चना सारख्या अंधत्वावर मात करीत शिकण्याची उमेद बाळगणा-या गरीब विद्यार्थिनीला आर्थिक मदत करायची आहे त्यांनी ---अर्चना संजय जाधव,सिंडिकेट बॅंक,कवठे येमाई शाखा,तिचा खाते क्रमांक-53302210018519 या क्रमांकावर आर्थिक मदत पाठवावी आय एफ एफ सी कोड-एस वाय एन बी 0005330 असा आहे.तर ज्यांना वस्तू किंवा धान्य रूपाने मदत पाठवायची आहे त्यांनी 9423083376,9850096512 या क्रमांकावर संपर्क साधून मदत पाठविण्याचे आवाहन हिळामळा ग्रामस्थांनी केले आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या