कुटे, विधाते परिवारांनी समाजापुढे ठेवला अादर्श!

रांजणगाव गणपती, ता. १९ फेब्रुवारी २०१६ (प्रतिनीधी)- सध्या विवाह समारंभात होणारा खर्च चर्चेचा विषय जरी ठरत असला तरी साामजिक अौदार्य दाखविण्याचे धाडस कुटे परीवाराने दाखविले अाहे.

येथील कुटे अाणि लांडे या विवाहसोहळ्यात ऍड. विकास कुटे यांनी सत्काराचा खर्च टाळुन लातुर येथील शेतक-यास तसेच अपघातात पाय गमावलेल्या विद्यार्थ्यास अार्थिक मदत करुन समाजापुढे या परिवाराने अादर्श ठेवला अाहे.तसेच शिरसगाव काटा येथील ग्रामपंचायत सदस्या अश्विनी मच्छिंद्र विधाते यांनी स्वत:च्या लग्नात देखील सत्काराला फाटा देत विधायक कामांसाठी ग्रामस्थांकडे निधी देऊ केला अाहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि लातुर येथील शेतक-याला कर्जापोटी स्वत:चा बैल विकावा लागणार होता.तसेच काही दिवसांपुर्वी रांजणगाव येथे महागणपतीच्या दर्शनासाठी अालेल्या कारकुड या विदयार्थ्याला अपघातात पाय गमवावा लागला होता.या दोन्ही गोष्टी वकील क्षेत्रात कार्यरत असणा-या ऍड. विकास कुटे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या दोन्ही कुटुंबांना मदत द्यायचे ठरविले.त्यानुसार त्यांनी स्वत:च्या विवाह सोहळ्यात लातुर येथील शेतक-यास निमंत्रित करुन सकाळ रिलिफ फंडाकडे सुपुर्त केला.यावेळी सकाळचे निमगाव म्हाळुंगीचे बातमीदार नागनाथ शिंगाडे यांनी तो स्विकारला.तसेच कारकुड या जखमी विद्यार्थ्याला देखील निधी देण्यात अाला.

या कार्यक्रमाला अॅड कुटे यांचे वडील दत्तात्रय कुटे, रांजणगावचे पोलिस निरिक्षक अशोक इंदलकर, सकाळचे उपसंपादक संतोष धायबर, पं. स. सदस्या दिपाली शेळके,  राणी नितीन चोरे, शिरुर तालुका डॉट कॉम चे सर्व सदस्य उपस्थित होते.
अॅड. विकास कुटे हे वकिली व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यातदेखील सक्रिय अाहेत.

दुसरीकडे शिरसगाव काटा येथील ग्रा.पं सदस्या अश्विनी विधाते  यांनी देखील स्वत:च्या लग्नात सत्काराला पु्र्ण फाटा देत समाजाच्या व गावच्या विकासासाठी रोख स्वरुपाची अार्थिक मदत माजी अामदार अशोक पवार यांच्या हस्ते उपसरपंच  विजेंद्र सुभाष गद्रे, सरपंच शिंदे, उपाध्यक्ष नरेंद्र माने, दत्तु लोंढे यांच्याकडे देऊ केली.

रांजणगाव येथील ऍड. विकास कुटे व शिरसगाव काटा येथील दोन्ही कुटुंबाने सामाजिक अौदार्य दाखवत केलेल्या मदतीने समाजापुढे नवा अादर्श घालून दिला अाहे.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या