पिंपळसुटी येथे शिवजयंतीनिमित्त तरुणांकडून रक्तदान !

पिंपळ सुटी ता.२१ फेब्रुवारी २०१६(प्रतिनीधी): येथे  शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वर्षी तरुणांनी मिरवणुकीच्या खर्चात काटकसर करुन रक्तदान शिबिर तसेच व्याखानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अहमदनगर येथिल "अष्टविनायक ब्लड बँक" यांच्यामार्फत हे रक्तदान शिबिर अायोजित करण्यात अाले होते.या वेळी सर्वच तरुणांनी उत्साहात रक्तदानात सहभाग नोंदवत रक्तदान केले.या शिबिरात सुमारे 32 बँग रक्त जमा झाले.रक्तपेढी चे डॉ. दिलीप दाणे ,डॉ शैलेंद्र पाटणकर  आणी महिला सहका-यांनी हे रक्तदान करुन घेतले.सायंकाळी शिवव्याखात्या प्रियंकाताई काटे यांचे शिवचरित्रपर व्याख्यान झाले.या वेळी काटे यांनी शिवरायांच्या इतिहासातील उदाहरणे देऊन सद्य स्थितीतील परिस्थिती बाबत भाष्य केले.

या प्रसंगी पिंपळसुटी चे पोलिस पाटिल तुकाराम वाबळे, सरपंच पारखे ,शरद गद्रे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षय काळे यांनी तर सचिन  तांबे यांनी प्रास्ताविक केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या