जिल्हा खो-खो स्पर्धेत वाघाळ्याचा संघ प्रथम

वाघाळे, ता. २१ फेब्रुवारी २०१६ (प्रतिनीधी): शेळगाव (ता. इंदापूर) येथील जिल्हास्तरीय झालेल्या खो-खो स्पर्धेत वाघाळे येथील आपली माती क्रीडा प्रबोधिनी संघाने 15 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले अाहे.

शांताई विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच कर्मयोगी कारखान्याचे संचालक अंबादास शिंगाडे व जे. के. क्रीडा मंचच्या वतीने ही स्पर्धा भरविली होती.या स्पर्धेत जिल्ह्यातून 16 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्‌घाटन इंदापूर पंचायत समितीच्या सभापती डॉ. सोनाली ननवरे,सरपंच अलका ननवरे यांच्या हस्ते, तर समारोपाला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कर्मयोगी कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार उपस्थित होते.

या वेळी राज्याचा विशेष क्रीडा शिक्षक पुरस्कार विजेते संभाजी पवार, दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार विजेते संजय बोडरे, जिल्हा क्रीडा मार्गदर्शक महेश चावले, जिल्हा खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेश बांदल यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी भागवत भुजबळ, राहुल जाधव, भगवान जाधव, यशवंत माने, प्रताप चवरे, मारुती जाधव, छगन शिंगाडे, मोहन दुधाळ, श्‍यामराव जाधव, सतीश मोहिते उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जे. के क्रीडा मंचचे संस्थापक अध्यक्ष कैलास जाधव, सयाजी येवले, उमेश सुपुते, परशुराम मोहिते, जयकुमार रावण यांनी प्रयत्न केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या