गंगारामबुवा कवठेकरांना तमाशा जीवनगौरव पुरस्कार प्रदान

कवठे यमाई, ता.२१ फेब्रुवारी २०१६ (सुभाष शेटे)  : राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने  देण्यात येणारा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणंगावकर जिवन गौरव पुरस्कार येथील  जेष्ठ तमाशा कलावंत गंगाराम बुवा कवठेकर यांना वयाच्या ८६ व्या वर्षी सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील भव्य समारंभात राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत  तमाशा कलावंत भिमराव तोताराम गोपाळ यांच्या हस्ते शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह,प् रशस्तीपत्र व पाच लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे, आमदार मंदाताई म्हात्रे, सांस्कृतिक विभागाचे संचालक अजय आंबेकर, सह संचालक मनोज सानप, सहायक संचालक शाम मोरे, विठाबाईंचा मुलगा विजय व नातू मोहित नारायणंगावकर, तमाशा क्षेत्रातील अनेक कलावंत, मुंबई परिसरातील असंख्य  तमाशा चाहते व  सुमारे १०० कवठेकर ग्रामस्थ या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.

उभी हयात तमाशासाठी वेचणा-या गंगारामाबुवा कवठेकर यांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या  देण्यात येणारा जिवन गौरव पुरस्कार  देण्यात आल्याने एका सच्च्या व हाडाच्या तमाशा कलावंताचा मोठा गौरव व सन्मान झाल्याची भावना कवठे येमाई व नारायनगावकर ग्रामस्थांनी  व्यक्त केली. काल हा पुरस्कार वितरण सोहळा  नवी मुंबई  येथे पार पडला.

यावेळी बोलताना राज्याचे शालेय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे म्हणाले, 'जुन्या काळात लावणी व तमाशा कलेला जो मान सन्मान होता तो सन्मान पुन्हा मिळवून देण्याकामी प्रयत्न करणार असून तमाशा व लावणी कार्यक्रमात प्रेक्षकाकडून अनेक ठिकाणी होणारी हुल्लडबाजी विषयी गंगाराम बुवा कवठेकर यांनी व्यक्त केलेली खंत लक्षात घेता अश्या कार्यक्रमांसाठी पोलिस संरक्षण देणार असल्याचे सांगितले. कलेच्या माध्यमातून संस्कृती पुढे जात असते त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून कला ही राजपुरस्कृत करण्याचे काम आम्ही नक्किच करू व आयुष्याच्या उतारवयात एखाद्या तमाशा कलावंतास आपण तमाशा कलावंत होतो याची खंत पडणार नाही, असे समर्थन त्यांच्या मागे उभे करू असे ही उपस्थित तमाशा कलावंताना तावडे यांनी सांगितले. गंगाराम बुवांचे आशीर्वाद मला मिळाले असून, त्यांना वयाची १०० वर्षे पूर्ण व्हावीत हि शुभेच्छा तावडे यांनी देत नवी मुंबई येथे तमाशा कलाकारांसाठी चांगली व डौलदार वास्तू उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित खात्याच्या माध्यमातुन पुढाकार घेणार आहे. महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने  जेष्ठ तमाशा कलावंत गंगाराम बुवा कवठेकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचे सांगितले.'
 
तत्पूर्वी, गंगाराम बुवा कवठेकर यांचे मुळ गाव असलेल्या कवठे येमाई येथील ग्रामस्थांनी पुरस्कार सोहळ्यासाठी नवी मुंबईकडे प्रयाण करण्यापूर्वी बुवांची वाजता गाजत मिरवणूक काढली होती. सकाळी नारायनगाव बसस्थानका शेजारी असणा-या विठाबाई नारायणगावकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर नारायणगावकर ग्रामस्थांनी पुरस्कार मूर्ती गंगाराम बुवा कवठेकर यांचा  यथोचित सत्कार केला. तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या नावाने शासनाकडून  दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे नारायणगावकरांचा सन्मानच असल्याची भावना ग्रामस्थांनी या वेळी व्यक्त केली.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या