...अन् आमदाबादच्या पवार कुटुंबाला मिळाला सातबारा !

आमदाबाद ता.२२ फेब्रुवारी २०१६ (तेजस फडके/सतीश केदारी) : येथील सुवर्णा रविंद्र पवार यांच्या महसुल अधिका-यांनी केलेल्या छळाची व दिलेल्या वागणुकीची तसेच "अप्पर जिल्हाधिका-यांच्या अादेशाला वाटाण्याच्या अक्षता" अशा मथळ्याखाली बातमी www.shirurtaluka.com वर प्रसिद्ध झाल्यानंतर महसूल विभागाने खडबडून जागे होत तातडीने पवार यांना जमीनीचा सातबारा सुपुर्त केला. या बाबत सर्वप्रथम पवार कुटुंबाची कैफियत संकेतस्थळानेच जनतेसमोर मांडली होती.

सविस्तर माहिती अशी कि, अामदाबाद येथील एेतिहासिक काळापासून नांवावर असलेली पर्डी जमीन पवार कुटुंबियांना कुठलीही पुर्व सुचना न देता परस्पर कमी करण्यात अाली होती. याची उशीरा माहिती समजल्यानंतर पवार कुटुंबाने जमीन पुन्हा मिळविण्यासाठी सुमारे वर्ष २०१२ पासून ते अाजतागायत संघर्ष केला. याच जमीनीच्या वादापायी या कुटुंबातील एका सदस्याला जीव गमवावा लागला अाहे. या प्रकरणात अप्पर जिल्हाधिका-यांनी जमिनीबाबत पुनर्जिवित करण्यात यावे असा अादेश देउनही महसुल च्या मग्रुर अधिका-यांनी या अादेशालाच केराची टोपली दाखवत अादेश पोहोचला नसल्याचे सांगितले होते. तरीही  पवार कुटुंबाने वारंवार न खचता महसुल चे उंबरठे झिजवणे सुरुच ठेवले होते. अनेक वेळा महत्वाचा दस्तावेज गहाळ झाला तर कित्येक वेळा किरकोळ कारणे देउन  महसुल च्या मग्रुर अधिका-यांनी केवळ वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पवार यांनीही जमीनीबाबत भक्कम पुरावे सादर करुन जमिनीबाबत सत्यता निदर्शनास अाणून दिली. संकेतस्थळासह व्हॉट्सॅप व फेसबुकवरून  बातमी शेअर होऊ लागल्यानंतर महसूल विभाग खडबडून जागे झाले व तातडीने पवार यांना सातबारा देऊ केला अाहे.

याबाबत पवार कुटुंबाशी संवाद साधला असता  त्या म्हणाल्या, 'गेल्या कित्येक दिवसांपासून महसूलविभागाकडून झालेल्या दिरंगाईने मोठया प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला आहे. अखेर न्याय मिळाला आहे. सर्वसामान्यांचा किती छळ होत असेल असे म्हणत महसुल च्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली अाहे.'
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या