कवठे येमाईत माघ पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा

कवठे यमाई, ता.२२ फेब्रुवारी २०१६ (सुभाष शेटे)- माघ पौर्णिमेच्या निमित्ताने आज येथील ग्रामदैवत श्री येमाई देवीची गावातुन संबळ, ताशा  सनईच्या मंगल सुरात सवाद्य  पालखीची मिरवणूक  काढण्यात आली होती.

येथील पालखीचा पारंपारिक मान देवीचे पुजारी गोरे व ब्राम्हण समाजाकडे आहे.त्या नंतर येथील कांदळकर पाटील यांची मानाची खंडोबाच्या काठीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या काठीचा पिढ्यान पिढ्या मान हा पोपटराव धोंडीबा कांदळकर या कुटूंबीयांकडे असतो. या पालखीला श्री भैरवनाथ तरुन मंडळातील कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. भंडा -याची उधळण करीत खंडोबा महाराज कि जय, सदानंदाचा येळकोट चा जय घोष करीत रंगी बेरंगी कापडी पताका लावलेली सुमारे ४० फुट उंचीच्या भव्य काठी मिरवणुकीत सहभागी अनेक खंडोबा भक्तांनी ही काठी उंचावण्याचा मान घेतला. गावातील मळाई देवी मंदिर ते दत्त मंदीर अशी या खंडोबा देवाच्या काठीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर ही काठी धामणी (ता. आंबेगाव) येथील श्री खंडोबा मंदिराकडे रवाना झाली.

येथील घरा-घरातून आज माघ पौर्णिमेचा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या